आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपले करिअर घडवले आहे. आयपीएल युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते. जेणेकरून ते त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करू शकतील. आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्यावर देश आणि जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
यावेळी आयपीएल लिलावासाठी 574 खेळाडूंची निवड करण्यात आली, असून त्यात आणखी तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 577 खेळाडू लिलावात असतील. यामध्ये 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडू आहेत. सर्व 10 फ्रँचायझी एकूण 210 खेळाडू खरेदी करू शकतात. सर्व संघांना त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 आणि किमान 18 खेळाडू घेऊ शकतात.
आयपीएल 2025 मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. प्रथम मार्की खेळाडूंवर बोली लावली जाईल. यावेळी 12 मार्की खेळाडू आहेत. यामध्ये रिषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क, केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल 2025 मेगा लिलाव पाहू शकता. तुम्ही या मेगा लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर पाहू शकता. दुसरीकडे, रिटेनशनबद्दल बोलायचे झाले, तर आयपीएल रिटेनशनमध्ये सर्व संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना कोणतेही आरटीएम करण्याची संधी मिळणार नाही. कारण या संघांनी 6-6 खेळाडूंना कायम ठेवले आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जला 4 आरटीएम करण्याची सर्वाधिक संधी आहे. संघाने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले होते.
हेही वाचा-
IND vs AUS; बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना
जीव वाचवणाऱ्या 2 लोकांना नाही विसरला पंत! महागडं गिफ्ट देऊन जिंकली मनं
IND vs AUS; उत्कृष्ट खेळीनंतर यशस्वी जयस्वालचा चाहता झाला ‘हा’ दिग्गज खेळाडू!