आयपीएल 2025 मेगा लिलावात सर्वच खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला आहे. विशेष म्हणजे, मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी अनकॅप्ड खेळाडूंवरही मोठी बोली लागली. नेहाल वढेरा ते नमन धीरपर्यंत, अनेक अनकॅप्ड खेळाडूंनी या लिलावात कोट्यावधी रुपये कमावले. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 5 अनकॅप्ड खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना त्यांच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त रक्कम मिळाली.
(1) नमन धीर – 5.25 कोटी (मुंबई इंडियन्स) – नमन धीरला अद्याप आयपीएलमध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत. तरीही मुंबई इंडियन्सनं त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. मेगा लिलावात त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि अगदी पंजाब किंग्जनंही त्याच्यामध्ये रस दाखवला. अखेर मुंबईनं या शर्यतीत बाजी मारली आणि नमनला 5.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं.
(2) अब्दुल समद – 4.20 कोटी (लखनऊ सुपर जायंट्स) – अब्दुल समदनं आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण केलं होतं. तो 2024 पर्यंत हैदराबादमध्येच होता. समदनं या मेगा लिलावात त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये ठेवली होती. त्याला लखनऊ सुपर जायंट्सनं तब्बल 4.20 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावून आपल्या संघात शामिल करून घेतलं.
(3) नेहाल वढेरा – 4.20 कोटी (पंजाब किंग्स) – नेहल वढेरा शेवटचे 2 सीझन मुंबई इंडियन्सकडून खेळला. तेथे त्याला 20 लाख रुपये मिळत होते. आता पंजाब किंग्जनं त्याला 4.20 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सनंही त्याच्यात रस दाखवला होता, पण शेवटी पंजाबनं बाजी मारली.
(4) आशुतोष शर्मा – 3.80 कोटी (दिल्ली कॅपिटल्स) – आयपीएल 2024 नं आशुतोष शर्माला मोठा स्टार बनवलं. त्यानं पंजाब किंग्ससाठी 11 सामन्यात 167 च्या स्ट्राईक रेटनं 189 धावा केल्या. विशेष म्हणजे त्यानं संघासाठी फिनिशरची भूमिका योग्यपणे निभावली होती. मेगा लिलावात त्याची मूळ किंमत फक्त 30 लाख रुपये होती. कदाचित आशुतोषलाही वाटलं नसेल की त्याच्यावर 3 कोटींच्या पुढे बोली लागेल.
(5) अंगक्रिश रघुवंशी – 3 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स) – सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी आयपीएल 2024 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्यानं 155 च्या झंझावाती स्ट्राइक रेटनं 163 धावा केल्या. यावेळी त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. यावेळीही त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं विकत घेतलं. संघानं त्याच्यावर 3 कोटी रुपयांची बोली लावली.
हेही वाचा –
हे आहेत भारताचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय, टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियात नवा विक्रम रचणार
IPL Auction 2025 Day 2: या खेळाडूंंवरही लागणार कोट्यावधी रुपयांची बोली, रिषभ पंतचा विक्रम मोडू शकतो
IPL Mega Auction; 3 खेळाडू ज्यांना लिलावात मिळाली 20 कोटींपेक्षाही अधिक रक्कम!