लखनऊ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर, कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. हंगामातील तिसऱ्या पराभवामुळे निराश झालेला कर्णधार पांड्या सामन्यानंतर भावनिक दिसत होता, त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो निराश होऊन चेहरा खाली करून उभा आहे. तो रडत असल्यासारखा दिसतोय.
Chin up champ!!
— Bruce Wayne (@_Bruce__007) April 4, 2025
Long way to go!
We need strong mentality Hardik Pandya once again, he looks so broke after this match due to snakes and fanboy mentality💔 pic.twitter.com/oWThflAkRi
शुक्रवारी (4 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने मुंबई इंडियन्सना विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य दिले होते. मिचेल मार्श (60) आणि एडेन मार्कराम (53) यांनी चांगले योगदान दिले. हार्दिक पांड्याने गोलंदाजीत इतिहास रचला, तो आयपीएलमध्ये 5 विकेट घेणारा पहिला कर्णधार बनला. मुंबई इंडियन्सची फलंदाजीत सुरुवात चांगली झाली नाही कारण त्यांनी दोन्ही सलामीवीर (विल जॅक्स, रायन रिकेलटन) 17 धावांवर गमावले. त्यानंतर नमन धीर (24 चेंडूत 46) आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरून मुंबईला सामना जिंकून दिला. सूर्यकुमारने 43 चेंडूत 67 धावा केल्या होत्या.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या तिलक वर्माने 25 धावा केल्या पण त्यासाठी त्याने 23 चेंडू खेळले, तो मोठे फटके मारण्यात अपयशी ठरला. यानंतर, तो 19 व्या षटकात रिटायर आउट झाला. हार्दिक पांड्याने 16 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या पण त्याला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवामुळे निराश झालेला हार्दिक पांड्या सामन्यानंतर भावनिक दिसला. त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो चेहरा निराश होऊन उभा आहे. चाहते असा अंदाज लावत आहेत की हार्दिक पांड्या रडत आहे.
या पराभवानंतर, मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या वरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनऊ ७व्या वरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचा हा 4 सामन्यांतील तिसरा पराभव आहे, संघाने केकेआरविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर (वानखेडे) फक्त एकच सामना जिंकला आहे.