आयपीएल 2025 मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजयी मार्गावर पुनरागमन केले. सलग चार विजयांनी सुरुवात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर शेवटचा सामना गमावला होता पण बुधवारी त्यांनी विजय मिळवला. सहा सामन्यांत 10 गुणांसह हा संघ आता पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. रॉयल्स संघ चार गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सकडून ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर क्रीजवर होते. अक्षर पटेलने चेंडू त्याचा सर्वात अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्ककडे सोपवला. टी-20 क्रिकेटमध्ये जेव्हा दोन प्रमुख फलंदाज खेळत असतात तेव्हा शेवटच्या षटकात सहज 9 धावा काढल्या जातात. पण स्टार्क तो स्टार्कच आहे. त्याने एकामागून एक यॉर्कर लेंथचे चेंडू टाकले. राजस्थानच्या दोन्ही फलंदाजांकडे याचे उत्तर नव्हते.
शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेटमायरने एक धाव घेतली आणि जुरेलला दुसऱ्या चेंडूवर फक्त एक धाव काढता आली. त्यानंतर, हेटमायरने सलग दोन चेंडूंवर 2 धावा काढल्या. आता दोन चेंडूत 3 धावा हव्या होत्या. यावेळी हेटमायरला फक्त एकच धाव घेता आली. स्टार्कने शेवटचा चेंडूही टाकला आणि त्यावर फक्त एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना जुरेल धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
#TATAIPL 2025’s FIRST 𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝐎𝐕𝐄𝐑! 😱🤩#DC and #RR give us yet another thriller. Who’s going to emerge victorious? ⚔
— Star Sports (@StarSportsIndia) April 16, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/nbBEFOkjkM #IPLonJioStar 👉 #DCvRR | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/4umue0JfjQ
सुपर ओव्हरमध्ये मिचेल स्टार्क गोलंदाजी करत असताना शिमरॉन हेटमायर (6) आणि रियान पराग (4) रॉयल्सकडून फलंदाजीसाठी आले. हेटमायर आणि परागने चौकार मारले पण पराग फ्री हिटवर धावबाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (0) धावबाद झाला. दिल्लीसमोर 12 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून केएल राहुल (नाबाद 7) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 6) फलंदाजीला आले तर रॉयल्सकडून संदीप शर्मा गोलंदाज होता. राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारला. स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.