आयपीएल 2025 च्या 22व्या सामन्यात, पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आमने-सामने होते. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नईचा 18 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने प्रियांश आर्यच्या स्फोटक शतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. ज्यात प्रियांश आर्यने विस्फोटक खेळी खेळली. त्याने या सामन्यात पोत्याने धावा केल्या. या युवा खेळाडूने चेन्नईच्या गोलंदाजांनाविरुद्ध बेदम फटकेबाजी केली. त्याने केवळ 42 चेंडूत 103 धावांची खेळी केली. आर्याने त्याच्या शतकी खेळीत 7 चौकार आणि 9 षटकार मारले.
I.C.Y.M.I
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
????????????????????????. ????????????????????????????????????????. ????????????????????????????????.
Priyansh Arya graced the home crowd with his effortless fireworks ????
Updates ▶ https://t.co/HzhV1Vtl1S #TATAIPL | #PBKSvCSK pic.twitter.com/7JBcdhok58
The Curvv Super Striker of the Match between Punjab Kings and Chennai Super KIngs goes to Priyansh Arya. #TATAIPL | #PBKSvCSK | #CurvvSuperStriker | @TataMotors_Cars pic.twitter.com/cEVwyvilMH
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
आर्य व्यतिरिक्त, शशांक सिंगने 36 चेंडूत जलद 52 धावा केल्या आणि नाबाद राहिला. शशांकने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच, मार्को जॅन्सेनने 19 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. चेन्नईकडून आर अश्विन आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर मुकेश चौधरी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्जच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला 5 गडी गमावून फक्त 201 धावा करता आल्या. डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 69 धावांची खेळी खेळली.






