---Advertisement---

RCB vs DC: घरच्या मैदानावर केएल राहुलची दादागिरी, आरसीबीचा दारुण पराभव

On: शुक्रवार, एप्रिल 11, 2025 6:21 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 24व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. राहुलने नाबाद 93 धावा केल्या. मात्र, तो शतक पूर्ण करू शकला नाही. दिल्लीचे गोलंदाज कुलदीप यादव आणि विप्रज निगम यांनीही चांगली कामगिरी केली. हंगामातील आरसीबीचा हा दुसरा पराभव ठरला.

आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, दिल्लीने 17.5 षटकांत लक्ष्य गाठले. घरच्या मैदानावर केएल राहुलची मॅचविनिंग कामगिरी पाहायला मिळाली. त्याने 53 चेंडूत नाबाद 93 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 38 धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि 1 षटकार मारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील हा सलग चौथा विजय आहे.

दिल्लीची सुरुवात खराब झाली. फाफ डु प्लेसिस आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना काही खास कामगिरी करता आली नाही. डु प्लेसिस फक्त 2 धावा करून बाद झाला. यश दयालने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर मॅकगर्क 7 धावा करून बाद झाला. अभिषेक पोरेलही 7 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुलच्या संयमी खेळीच्या बदल्यात दिल्लीने अशक्य वाटणारा सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---