---Advertisement---

LSG vs RCB: ‘हा’ ठरला आरसीबीच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

आयपीएल 2025च्या शेवटच्या लीग सामन्यात आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सचा एकतर्फी पराभव केला. (IPL 2025; RCB Beat LSG) हा सामना टाॅप-2 मध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला जिंकणे गरजेचे होते. पहिल्या डावात खेळताना लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर मर्यादित 20 षटकांत 228 धावांचा डोंगर उभा केला. पंत शिवाय मिचेल माशर्न (67) धावा केल्या.

228 धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दमदार सुरुवात केली. फिलिप सॉल्टने 30 आणि विराट कोहलीने 54 धावा करत ठोस पाया रचला. (Virat Kohli-Philip Salt) मात्र, लखनऊ सुपर जायंट्सने मधल्या षटकांत झपाट्याने पुनरागमन केलं. रजत पाटीदार (14) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (0) झटपट बाद झाल्याने आरसीबी अडचणीत आली होती. (RCB Attacking Opening Partnership)

अशा दबावाच्या परिस्थितीत मैदानावर आले मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा, ज्यांनी संयम आणि आक्रमकतेचा उत्कृष्ट मिलाफ साधत 107 धावांची मॅच विनिंग भागीदारी रचली. (Mayank Agrwal – Jitesh Sharma Match Winning Partnership)

मयंकने 23 चेंडूंमध्ये 41 धावा करत जबाबदारीने खेळ सावरला, तर दुसऱ्या बाजूला जितेशने विस्फोटक खेळी करत अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 85 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकार होते, ज्यामुळे सामना आरसीबीच्या बाजूने झुकला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---