आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींची कायम ठेवण्याची यादी समोर आली आहे. हेनरिक क्लासेन रिटेन्शन यादीत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. हैदराबादने त्याला 23 कोटी रुपयांना रिटेन केले. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली सर्वात महागडा रिटेनर ठरला आहे. आरसीबीने त्याला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. तसेच असे अनेक खेळाडू होते ज्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आणि ते थेट लखपतींमधून करोडपती झाले.
1. रिंकू सिंग- मेगा लिलावापूर्वी केकेआरने सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये दमदार फलंदाज रिंकू सिंगचाही समावेश आहे. रिंकूला केकेआरने 13 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. गेल्या हंगामात त्याचा पगार 55 लाख रुपये होता.
2. मयंक यादव- वेगवान गोलंदाज मयंक यादव त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. गेल्या मोसमात तो फक्त चार सामने खेळला. पण आपली छाप सोडण्यात तो यशस्वी ठरला. एलएसजीने मयंकला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. गेल्या हंगामात त्याचा पगार 20 लाख रुपये होता.
3. नितीश रेड्डी- युवा अष्टपैलू नितीश रेड्डी आता कॅप्ड खेळाडू बनला आहे. रेड्डीला कायम ठेवण्यासाठी एसआरएचने 6 कोटी रुपये खर्च केले आहेत. रेड्डी आयपीएल 2024 मध्ये 20 लाख रुपयांना खेळला होता.
4. शशांक सिंग- शशांक सिंग अशा दोन खेळाडूंपैकी एक आहे. ज्यांना पंजाब किंग्जने आगामी हंगामासाठी कायम ठेवले आहे. शशांकला 5.5 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. आयपीएल 2024 च्या लिलावातपंजाब किंग्जने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले.
5. प्रभसिमरन सिंग- पंजाब किंग्जने आगामी हंगामासाठी प्रभसिमरन सिंगला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभासिमरनला गेल्या मोसमात खेळण्यासाठी 60 लाख रुपये मिळाले होते. त्याला आता 18 व्या हंगामासाठी 4 कोटी रुपये मिळाले आहेत.
6. हर्षित राणा- केकेआरने हर्षित राणाला आयपीएल 2025 साठी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी 20 लाख रुपये मिळाले होते.
7. रमनदीप सिंग- रमनदीप सिंग हा दुसरा अनकॅप्ड खेळाडू आहे. ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवले आहे. यावेळी रमणदीप सिंग देखील करोडपती झाला. कारण तो 4 कोटी रुपये कमवण्यात यशस्वी ठरला होता.
8. मथिशा पाथिराना- चेन्नई सुपर किंग्जने मथिशा पाथिरानावर आपला विश्वास कायम ठेवला आहे. फ्रँचायझीने श्रीलंकेच्या या युवा वेगवान गोलंदाजाला 13 कोटी रुपयांच्या मोबदल्यात कायम ठेवले आहे.
9. आयुष बदोनी- लखनऊ सुपर जायंट्सने देखील दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये युवा फलंदाज आयुष बदोनीच्या नावाचा समावेश आहे. गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला 20 लाख रुपये मिळाले होते. यावेळी त्याला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.
10. मोहसीन खान- एलएसजीनेही मोहसीन खानला कायम ठेवले आहे. त्याला चार कोटींची मोठी रक्कमही मिळाली आहे. गेल्या हंगामात त्याची किंमत 20 लाख रुपये होती.
11. अभिषेक पोरेल- युवा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल आयपीएलच्या आगामी हंगामात पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. डीसीने त्याला चार कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
12. ट्रिस्टन स्टब्स- दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला गेल्या मोसमात खेळण्यासाठी 50 लाख रुपये मिळाले. यावेळी आयपीएल 2025 साठी फ्रँचायझीने त्याला 10 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
13. ध्रुव जुरेल- राजस्थान रॉयलने यावेळी युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. गेल्या मोसमात त्याला खेळण्यासाठी 20 लाख रुपये मिळाले होते.
14. रजत पाटीदार- आरसीबीने तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये रजत पाटीदारच्या नावाचाही समावेश आहे. पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. गेल्या मोसमात त्याला 20 लाख रुपये मिळाले होते.
हेही वाचा-
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!
IND VS NZ; भारतासाठी सुटकेचा श्वास, किवी संघाचा मॅचविनर खेळाडू मुंबई कसोटीतून बाहेर
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट