---Advertisement---

VIDEO: कॅप्टन रहाणेच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वक्तव्यानंतरचा परिणाम, कॅमेरॉन ग्रीनने केले असे काही

On: गुरूवार, एप्रिल 2, 2026 12:50 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्यांनी आपला या हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने कॅमेरॉन ग्रीनने गोलंदाजी केली नाही याबाबत निराशा व्यक्त केली होती. आज (गुरूवार, २ एप्रिल) केकेआरचा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी केकेआरने ग्रीनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

आयपीएल १९व्या हंगामात केकेआर त्यांच्या पहिल्या सामन्यात (मुंबई इंडियन्स) २२१ धावसंख्येचा बचाव करताना अपयशी ठरला होता. या सामन्यानंतर रहाणेला ‘ग्रीनने गोलंदाजी का केली नाही’, असे विचारले होते. तेव्हा त्याने ‘हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा’, असे उत्तर त्याने दिले होते. त्याने संघाच्या गोलंदाजीच्या संतुलनाबाबत चिंता व्यक्त केली होती.

रहाणेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपली भुमिका स्पष्ट केली आणि सांगितले की ग्रीनच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली असून तो त्यातून सावरत आहे. यामुळेच तो हळूहळू गोलंदाजीचा सराव वाढवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्रीनच्या या स्थितीबाबत आधीच केकेआरला सांगितले होते. आता केकेआरने पोस्ट केलेल्या त्या व्हिडिओमध्ये ग्रीन नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

या सर्व प्रकारानंतर आता ग्रीनने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करण्यास प्राधान्य दिल्याचे कळते. त्याला केकेआरने २०२६ च्या लिलावात विक्रमी २५.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो एक अष्टपैलू असून त्याच्याकडून फलंदाजीबरोबर गोलंदाजीचीही अपेक्षा आहे. त्याने मुंबईविरुद्ध गोलंदाजी केली नसल्याने संघात पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता, त्याच्यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या.

ग्रीनने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केल्याने तो सामन्यात कधी प्रत्यक्ष गोलंदाजी करेल हे लवकरच कळेल. ग्रीनच्या गोलंदाजीमुळे संघात योग्य संतुलन निर्माण होईल. त्याने गोलंदाजी न केल्याने आयपीएलदरम्यानच्या कामाचे व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या राष्ट्रीय क्रिकेट बोर्डचा वाढता प्रभाव अशा विविध चर्चा सुरू झाल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---