---Advertisement---

IPL 2026 लिलावाचा थरार संपला! 77 खेळाडूंवर शिक्कामोर्तब, पाहा 10 संघांचे फुल स्क्वाड

On: बुधवार, डिसेंबर 17, 2025 2:35 PM
---Advertisement---

आयपीएलचा 19वा हंगाम 26 मार्च 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी 16 डिसेंबरला अबू धाबी येथे झालेल्या प्लेयर ऑक्शनमध्ये 359 खेळाडू शॉर्टलिस्ट होते, त्यापैकी 77 खेळाडू खरेदी झाले. या लिलावात परदेशी खेळाडूंसह भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर विशेष लक्ष होते. सर्व फ्रेंचायझींनी मिळून 215.45 कोटी रुपये खर्च केले, तर खरेदी झालेल्या खेळाडूंमध्ये 29 परदेशी खेळाडू आहेत.

या ऑक्शनमधील सर्वात महाग खेळाडू ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरून ग्रीन ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 25.20 कोटी रुपये मोजले. त्यानंतर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना 18 कोटींना KKR च्या ताफ्यात दाखल झाला.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने दोन भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर 28.40 कोटी रुपये खर्च करत वेगळी रणनीती दाखवली. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी 14.20 कोटी रुपये देण्यात आले. तर सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडच्या लियम लिविंगस्टनला 13 कोटींना आपल्या संघात सामील करून घेतले.

आयपीएल 2026 साठी सर्व 10 संघांचे संपूर्ण स्क्वाॅड

एमआय- हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, राज बावा, रघु शर्मा, मिचेल सॅन्टनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनजर, अश्विनी कुमार, दीपक चाहर, विल जॅक्स, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडेय, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, मोहम्मद इजहार, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर आणि मयंक रावत.

सीएसके – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, संजू सॅमसन, अकील हुसैन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चाहर, जॅक फाउल्क्स.

आरसीबी- रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पांड्या, स्वप्निल सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, जेकब डफी, सात्विक देसवाल, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा.

केकेआर- अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंग, रिंकू सिंग, राॅवमन पॉवेल, सुनील नारायण, उमरान मलिक, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन एलन, मथीशा पाथिराना, तेजस्वी सिंग, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप.

एसआरएच– पॅट कमिन्स (कर्णधार) अभिषेक शर्मा, लियम लिविंगस्टन, जॅक एडवर्ड्स, सलिल अरोड़ा, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसैन, क्राइनस फुलेट्रा, अमित कुमार, ओंकार तरमाले, शिवम मावी, अनिकेत वर्मा, ब्रायडन कार्से, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, हेनरिक क्लासेन, ईशान किशन, जयदेव उनादकट, कामिंदू मेंडिस, नीतीश कुमार रेड्डी, आर स्मरण, ट्रॅव्हिस हेड, झिशान अंसारी.

डीसी- अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, केएल राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, समीर रिजवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, नितीश राणा, आकिब नबी, पथुम निसंका, बेन डकेट, लुंगी एनगिडी, काइल जेमिसन, पृथ्वी शॉ, डेविड मिलर, साहिल पारेख.

पीबीकेएस – श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, बेन ड्वारशुइस, विशाल निषाद, प्रवीण दुबे, अर्शदीप सिंग, अजमतुल्लाह उमरजई, हरनूर पन्नू, हरप्रीत बरार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहाल वढेरा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, पायला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, व्यशांक विजयकुमार, झेवियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

एलसजी- रिषभ पंत (कर्णधार), एनरिक नॉर्खिया, जोश इंग्लिस, वनिंदू हसरंगा, अक्षत रघुवंशी, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अब्दुल समद, एडन मार्कराम, आकाश सिंग, अर्जुन तेंडुलकर, अर्शीन कुलकर्णी, आवेश खान, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, हिम्मत सिंग, मणिमारन सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मयंक यादव, मोहम्मद शमी, मिशेल मार्श, मोहसिन खान, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद.

आरआर- यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, संदीप शर्मा, युद्धवीर चरक, रवि बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विग्नेश पुथुर, रवि सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा, अ‍ॅडम मिल्ने, कुलदीप सेन.

जीटी- शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंग बरार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, टॉम बँटन, अशोक शर्मा, ल्यूक वुड, पृथ्वी राज यारा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---