---Advertisement---

IPL 2026: हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा तगडा स्क्वाड तयार, जुना हिरो परतला!

On: मंगळवार, डिसेंबर 16, 2025 9:48 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा (MI) संपूर्ण संघ आता तयार झाला असून, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी मैदानात उतरण्यास सज्ज आहे. यंदाच्या रिटेन्शन प्रक्रियेत मुंबईने फारसे बदल न करता कोअर संघ कायम ठेवण्यावर भर दिला. त्यामुळेच लिलावाच्या दिवशी मुंबई इंडियन्सकडे मर्यादित बजेट असूनही संघाला फार मोठ्या बोली लावण्याची गरज भासली नाही.

यंदाच्या IPL ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स केवळ 2.75 कोटी रुपयांच्या पर्ससह उतरली होती. मात्र तरीही संघाने अचूक नियोजन करत आपल्या जुन्या आणि विश्वासू खेळाडूला पुन्हा संघात परत आणले. दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकचं मुंबईत पुनरागमन झालं असून, अवघ्या 1 कोटी रुपयांत MI ने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. डिकॉक यापूर्वी 2019 ते 2021 या कालावधीत मुंबईकडून खेळला असून, त्याने त्या काळात संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. गरज पडल्यास तो पुन्हा एकदा ओपनरची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो.

मागील काही हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अपेक्षेप्रमाणे गेले नसले, तरी यंदाचा संघ कागदावर तरी संतुलित आणि मजबूत दिसत आहे. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारख्या अनुभवी फलंदाजांसह जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्टसारखे घातक गोलंदाज संघात असल्याने MI कडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मार्चच्या अखेरीस IPL 2026 सुरू होण्याची शक्यता असून, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई कसा खेळ दाखवते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू:
हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, मिचेल सॅन्टनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनजर, अश्विनी कुमार, दीपक चाहर, विल जॅक्स, रघु शर्मा, राज अंगद बावा

ट्रेडद्वारे संघात आलेले खेळाडू:
शेरफेन रदरफोर्ड (गुजरात टायटन्स), मयंक मार्कंडेय (KKR), शार्दुल ठाकूर (LSG)

IPL 2026 ऑक्शनमध्ये खरेदी केलेले खेळाडू:
क्विंटन डी कॉक (1 कोटी), मोहम्मद इजहार (30 लाख), दानिश मालेवार (30 लाख), अथर्व अंकोलेकर (30 लाख), मयंक रावत (30 लाख)

मुंबईने रिलीज केलेले खेळाडू:
सत्यनारायण राजू, रीस टॉपले, के. एल. श्रीजीत, कर्ण शर्मा, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड), बेवन जेकब्स, मुजीब उर रहमान, लिझाड विलियम्स, विग्नेश पुथुर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---