---Advertisement---

IPL 2026: केकेआरच्या पराभवासाठी खेळाडू-कॅप्टन रहाणेला का दोषी ठरवावे? यामागे एकच व्यक्ती जबाबदार

On: बुधवार, एप्रिल 15, 2026 10:37 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ चा हंगाम कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासाठी निराशाजनक ठरत आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मंगळवारी (१४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) केकेआरचा ३२ धावांनी पराभव केला. या पराभवाचे खापर कर्णधार अजिंक्य रहाणे याने त्यांच्या फलंदाजीवर फोडले. सामन्यात गोलंदाजी यशस्वी झाली नाही, तर त्यांना दोष द्यायचा. सलगच्या पराभवामुळे रहाणेच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मात्र या पराभवांसाठी कर्णधार आणि खेळाडू यांनाच दोष देणे योग्य का?

खेळण्यासाठी कर्णधार आणि खेळाडू मैदानावर उतरतात, पण त्याआधी मुख्य प्रशिक्षकाचीही काही भूमिका असते. केकेआरच्या पराभवासाठी मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर जबाबदार नाही का? त्यांचे कोचिंग रिपोर्ट-कार्ड पाहिले तर त्यांना का दोषी ठरवते जात आहे, हे कळेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून नायर यांना अपयशाची मालिकाच लाभली आहे. त्यांनी जिथे-जिथे प्रशिक्षण दिले, तिथे-तिथे अपयशाने त्यांचा पाठलाग केला आहे.

आयपीएल २०२६ मध्ये केकेआरसोबत त्यांच्या प्रशिक्षणाचा अहवाल पाहिला तर संघाने पाच पैकी एकही सामना जिंकलेला नाही. त्यातील चार सामने गमावले, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे केकेआर गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.

नायर याचे अपयश हे केवळ आयपीएलपुरते मर्यादित नाही. याआधी त्यांनी डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये (महिला प्रिमीयर लीग) यूपी वॉरियर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता, तेव्हा संघाने आठ पैकी दोनच सामने जिंकले होते. यामुळे यूपी डब्ल्यूपीएल २०२६ च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले होते.

नायर विदेशी टी२० लीगमध्येही प्रशिक्षत म्हणून अपयशी ठरला आहे. आयएलटी २० २०२३ मध्ये तो अबू धाबी नाइट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक होता, तेव्हा संघाने १० पैकी केवळ एकच सामना जिंकला होता. तसेच कॅरेबियन प्रिमीयर लीग २०२२ मध्ये, नायर द ट्रिनबॅगो रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक होता, तेथे संघाने १० पैकी केवळ ३ सामने जिंकले.

वरील आकडेवारीवरून नायरची कामगिरी मुख्य प्रशिक्षक म्हणून निराशाजनक राहिली आहे. जर हे केवळ एकच टी२० लीगपर्यंत मर्यादित असते तर ठीक होते, मात्र तो भारताबरोबरच विदेशी टी२० लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून अपयशी ठरला आहे. केकेआरने मागील १८ सामन्यांमध्ये केवळ ४ मध्ये विजय मिळवला आहे. ही कामगिरी पाहता कर्णधार म्हणून रहाणेनेही निराशा केली, मात्र मुख्य प्रशिक्षकांच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---