भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये मागील 8 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचं नेतृत्व करत आहे. या 8 हंगामात कोहलीला एकदाही आयपीएलचा किताब मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
या हंगामात साखळी फेरीतील अखेरच्या काही सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सलग पराभव होऊनही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. परंतु, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात या संघाला पराभव पत्करावा लागला आणि हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर बरीच टिका झाली.
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही विराट कोहलीला कर्णधारपदापासून दूर करण्याची वेळ आली आहे, असे मत मांडले. त्याच्या मते एखाद्या कर्णधाराने 8 वर्षे नेतृत्व केल्यानंतरही किताब मिळवला नाही, तर त्याला कर्णधारपदावरून दूर केले पाहिजे.
तथापि, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले, तर संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल? आम्ही आपल्याला या लेखात 3 संभाव्य खेळाडूंबद्दल सांगत आहोत जे आरसीबीचा पुढील कर्णधार म्हणून नियुक्त होऊ शकतात.
१. एबी डिविलियर्स
विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले, तर कर्णधारपदाच्या शर्यतीत पहिले नाव एबी डिविलियर्स असले पाहिजे. डिविलियर्स हा बऱ्याच वर्षांपासून आरसीबीकडून खेळत आहे आणि संघातील छोट्या मोठ्या गोष्टीची त्याला चांगली जाणीव आहे.एबी डिविलियर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदाचा अनुभवही आहे. अशा परिस्थितीत तो आरसीबीसाठी चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध होऊ शकते. जरी तो पुढील काही हंगामातच आरसीबीकडून खेळू शकला, तरीही एक किंवा दोन वर्षात तो संघाचे भविष्य बदलू शकतो.
२. मोईन अली
कर्णधारपदासाठी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली हादेखील चांगला पर्याय आहे. इंग्लंडच्या संघाचे त्याने नेतृत्व केले असून तो टी20 क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहे. अलीकडे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेचे नेतृत्व केले होते. मोईन अली हा एक चांगला फिरकीपटू आणि चांगला फलंदाज आहे. तो लांबलचक फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. मोईन अली हा एक खेळाडू आहे जो काही चेंडूतच सामन्याची स्थिती बदलू शकतो. अशा परिस्थितीत आरसीबी त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते.
अॅरॉन फिंच
आरसीबीचा सलामीवीर अॅरॉन फिंचने या हंगामात अजिबात चांगली कामगिरी केली नाही. तो ज्या प्रकारच्या खेळीसाठी ओळखला जातो, ते पाहता फिंचची कामगिरी अत्यंत खराब होती.
तथापि अॅरॉन फिंचला कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. कधीकधी जेव्हा कर्णधारपद मिळते तेव्हा खेळाडूचे भाग्यही बदलते. जर फिंचला कर्णधार केले तर कदाचित आरसीबीचेही भाग्य बदलू शकेल आणि तो स्वत: देखील चांगली कामगिरी करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
वेळ पडली तर पंतप्रधान मोदींकडे करणार शमीच्या कुटुंबीयांची तक्रार, हसीन जहां भडकली
IPL Qualifier 2: फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दिल्ली-हैदराबाद आमने-सामने; असे असू शकतात ११ जणांचे संघ
‘एबी डिविलियर्स सोबतची ‘ती’ आठवण आयुष्यभर जपून ठेवेन,’ चहलच्या होणाऱ्या पत्नीची भन्नाट पोस्ट
ट्रेंडिंग लेख –
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?