मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आहे. मध्यंतरी तो कौटुंबिक कारणांमुळे चर्चेचा विषय बनला होता. सन 2018 मध्ये त्याची पत्नी हसीन जहाने त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप लावला होता.एवढंच नव्हे, तर मोहम्मद शमीचा इतर मुलींशी संबंध असल्याचाही आरोपही तिने केला होता. त्यानंतर ते दोघे वेगळे राहत होते. नुकताच हसीन जहां हिने पुन्हा एकदा मोहम्मद शमीच्या कुटुंबियांवर आरोप केला आहे.
मतदार यादीतून नाव काढून टाकण्याचा रचला कट-हसीन जहा
हसीन जहांने मोहम्मद शमीच्या कुटूंबातील सदस्यांवर आरोप केला आहे की त्यांचे परिचित असलेले काही लोकं तिचे नाव गावाच्या मतदार यादीतून काढून टाकण्याचा कट रचत आहे. हसीन जहां म्हणाली की तिच्या सासरच्या लोकांनी बीएलओ मतदार यादीतून तिचे नाव काढून टाकण्याची शिफारस केली आहे. हसीन जहां म्हणाली की, “मोहम्मद शमीची पत्नी म्हणून त्याच्या मूळ गावात माझे मत आहे. याबाबत मी डीएमकडे तक्रारही करणार आहे.”
…तर राज्याच्या मुख्यमंत्रांकडे आणि पंतप्रधानांकडे करणार तक्रार
हसीन जहा हिने म्हटले आहे की जर तिचे म्हणणे ऐकले नाही गेले आणि यासंदर्भात कारवाई झाली तर ती निवडणूक आयोगाकडे जाईल. यासह, या संदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले
व्हाट्सऍपवरील गप्पांचे शेअर केले होते स्क्रीनशॉट्स
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुमारे दोन वर्षांपूर्वी मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ करण्याचा, मारहाण करण्याचा यासह इतर मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. एवढंच नव्हे, तर तिने व्हाट्सऍपवरील गप्पांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते. मोहम्मद शमी सध्या युएईमध्ये असून ऑस्ट्रेलिया दौर्याची तयारी करत आहे.






