क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात फलंदाजांनी सातत्याने चांगली कामगिरी करणे आवश्यक असते, फलंदाजीत सातत्य ठेवल्यास संघाला यश मिळू शकते. याप्रमाणेच आयपीएल या टी-२० स्वरूपातील स्पर्धेतही सातत्याने चांगली कामगिरी करणे देखील आवश्यक आहे.
क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात बाद होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे बऱ्याचदा फलंदाजांचे अर्धशतक, शतक हुकते. पण असे असले तरी अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी वेगवान धावाही केल्या आणि त्याबरोबरच ५० धावांचा आकडाही पार केला. विशेष म्हणजे त्यांच्या कामगिरीत सातत्यही होते.
या लेखात, आपण तीन भारतीय फलंदाजांविषयी चर्चा करणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये सलग ४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सलग ४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे ३ फलंदाज –
३. शिखर धवन – आयपीएल २०२०
या आयपीएल हंगामात शिखर धवनने ही कामगिरी केली आहे. या हंगामात धवन अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि तो दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजीची धुरा सांभाळत आहे. धवनने या आयपीएलमध्ये दोन शतके ठोकली असून त्याने सलग ४ सामन्यात ५० धावांचा आकडा देखील पार केला आहे. धवनने गेल्या चार सामन्यात नाबाद ६९, ५७, नाबाद १०१, नाबाद १०६ धावा केल्या आहेत. यंदा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत धवन दुसर्या क्रमांकावर असून या हंगामात आतापर्यंत त्याने १० सामने खेळले आहेत आणि त्यात ४६५ धावा केल्या आहेत.
२. विराट कोहली – आयपीएल २०१६
आयपीएल २०१६ मध्ये विराट कोहलीने आयपीएलमधील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी केली होती. विराटने त्या हंगामात एकूण ४ शतके केली होती आणि एकूण ९७३ धावा केल्या. आयपीएलमध्ये सलग ४ सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा विराट दुसरा भारतीय फलंदाज आहे.
१. वीरेंद्र सेहवाग – आयपीएल २०१२
वीरेंद्र सेहवागनेही आयपीएलमध्ये सलग ४ सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा ठोकण्याची कामगिरी बजावली होती. सेहवागने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात दिल्ली कॅपिटलस (दिल्ली डेअरडेव्हिल्स) पासून केली. सेहवागने २०१२ मध्ये सलग ४ सामन्यात त्याने नाबाद ८७, ७३, ६३ आणि ७३ धावा केल्या होत्या. त्यावेळी अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.
महत्वाच्या बातम्या –
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
-‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट
-प्रीती झिंटाच्या पंजाब संघाचा ‘युनिव्हर्सल बॉस’ आता लढवणार सलमान खानच्या संघाची खिंड?
ट्रेडिंग लेख –
-जबदस्त इच्छाशक्ती! एका कानाने ऐकू येत नसतानाही आरसीबीचा ‘हा’ खेळाडू गाजवतोय आयपीएल
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे