---Advertisement---

मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम

On: बुधवार, ऑक्टोबर 21, 2020 10:14 PM
---Advertisement---

कोणत्याही गोलंदाजांचं एकच लक्ष्य असतं ते म्हणजे, विरुद्ध संघाच्या फलंदाजांना कमीत-कमी धावा देणे आणि जास्तीत जास्त विकेट्स घेणे. अशात एखादे षटक निर्धाव (पूर्ण षटकात एकही धाव नाही) ठरले, तर गोलंदाजाच्या आनंदाचा ठिकाणा राहत नाही. अशातच बुधवारी (२१ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडिमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मोहम्मद सिराजने चक्क २ निर्धाव षटके टाकली.

कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. पण बेंगलोरच्या गोलंदाजांनी अतुलनीय प्रदर्शन करत २० षटकात ८ विकेट्स घेत कोलकाताला फक्त ८४ धावांत रोखले. दरम्यान २६ वर्षीय वेगवान गोलंदाज सिराजने पूर्ण डावात ४ षटके गोलंदाजी करताना २ निर्धाव षटके टाकली आणि केवळ ८ धावा देत ३ फलंदाजांना तंबूत पाठवलं. यासह आयपीएलच्या एका सामन्यात २ निर्धाव षटके टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

सिराजव्यतिरिक्त बेंगलोरचे गोलंदाज ख्रिस मॉरिस आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी एक निर्धाव षटक टाकले. त्यामुळे आयपीएलच्या एका डावात तब्बल ४ निर्धाव षटके पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी आयपीएलच्या एका डावात कोणत्याही संघाच्या गोलंदाजांनी मिळून फक्त २ निर्धाव षटके टाकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य

‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट

प्रीती झिंटाच्या पंजाब संघाचा ‘युनिव्हर्सल बॉस’ आता लढवणार सलमान खानच्या संघाची खिंड?

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू

धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे

बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---