मंगळवारी(२० ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या ३८ व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. पण दिल्लीला पराभव स्विकारावा लागला असला तरी या सामन्यात शतक करणारा दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
क्रिकेटमध्ये असे क्वचितच होते की पराभूत होणाऱ्या संघाच्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात येतो. शिखर आयपीएलमध्ये पराभूत संघात असूनही सामनावीर पुरस्कार मिळवणारा १४ वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी १३ खेळाडूंनी आयपीएलमध्ये पराभूत संघात असतानाही सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.
युवराज सिंग याला २ वेळा पराभूत संघात असताना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. त्याला २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आणि २०११ ला दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळताना त्याचा संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळाला होता.
शिखरने मंगळवारी ६१ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पाही पार केला. तसेच तो आयपीएलमध्ये सलग २ सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडू आहे. याआधी त्याने १७ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध देखील शतकी खेळी केली होती.
आयपीएलमध्ये पराभूत संघात असतानाही सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
१. एल्बी मॉर्केल – विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २००८ (कामगिरी – ७१ धावा आणि २ विकेट्स)
२. श्रीवत्स गोस्वामी – विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, २००८ (कामगिरी – ५२ धावा)
३. युवराज सिंग – विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २००८ (कामगिरी – ५० धावा आणि ३ विकेट्स)
४. अनिल कुंबळे – विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २००९ (कामगिरी – नाबाद १ धाव आणि ४ विकेट्स)
५. युसुफ पठाण – विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१० (कामगिरी – १०० धावा)
६. युवराज सिंग – विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, २०११ (कामगिरी – नाबाद ६६ धावा आणि ४ विकेट्स)
७. राहुल शर्मा – विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०११ (कामगिरी – २ विकेट्स)
८. डेल स्टेन – विरुद्ध मुंबई इंडियन्स,२०१२ (कामगिरी – ३ धावा आणि २ विकेट्स)
९. सुनील नरेन – विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब,२०१२ (कामगिरी – ५ विकेट्स)
१०. विराट कोहली – विरुद्ध गुजराज लायन्स, २०१६ (कामगिरी – नाबाद १०० धावा)
११. हाशिम आमला – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६ (कामगिरी – ९६ धावा)
१२. ख्रिस मॉरिस – विरुद्ध गुजरात लायन्स, २०१६ (कामगिरी – नाबाद ८२ धावा आणि २ विकेट्स)
१३. ऍडम झम्पा – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६ (कामगिरी – ६ विकेट्स)
१४. अंकित राजपूत – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८ (कामगिरी – ८ धावा आणि ५ विकेट्स)
१५. शिखर धवन – विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, २०२० (कामगिरी – नाबाद १०६ धावा)
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्ठा गेम झाला यार! पूरनमुळे धाव चोरण्याचा सावळा गोंधळ अन् मयंक थेट तंबूत दाखल
शिखर ‘द वन’..! सलग २ आयपीएल सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास
ट्रेंडिंग लेख –
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले