आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकताच नवीन एफटीपी म्हणजेच फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला आहे. या एफटीपीमध्ये येत्या चार वर्षात होणाऱ्या क्रिकेट मालिका, आयसीसी स्पर्धा आणि विविध देशांच्या टी२० लीगची विंडो असे वेळापत्रकही जाहीर केले. या एफटीपीमधील महत्वाची गोष्ट म्हणजे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या टी२० लीग एकाच वेळी होणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जवळपास एकाच कालावधीत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नवीन फ्युचर टूर प्रोग्राममध्ये २०२४ ते २०२७ या कालावधीतील सर्व क्रिकेट आयोजनांची सविस्तर माहिती दिली गेली आहे. २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला दिले गेलेय. ही आयसीसीची महत्त्वाची स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होईल. त्यामुळे पाकिस्तानात दरवर्षी होणारी पाकिस्तान सुपर लीग ही फ्रॅंचाईजी क्रिकेट लीग मार्च ते मे या कालावधीसाठी पुढे ढकलली गेली आहे. सध्या पीएसएलला डिसेंबर ते फेब्रुवारी अशी विंडो दिली जात आहे. मात्र, आता पीएसएल पुढे ढकलल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संकटात सापडू शकते.
एफटीपीनुसार, २०२५ मध्ये पीएसएल व भारतातील आयपीएल या दोन्ही लीगला मार्च ते मे अशी विंडो दिली गेली आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी व श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. जगातील सर्वच अव्वल खेळाडू आयपीएल मध्ये खेळण्यास प्राधान्य देतात. २०२५ मध्ये जे खेळाडू पीएसएल व आयपीएल या दोन्ही ठिकाणी खेळतात, ते खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. कारण, पीएसएलच्या तुलनेत आयपीएलमध्ये कैक पटीने अधिक आर्थिक लाभ होतो. याच कारणाने मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू नसल्यास पीएसएलकडे प्रायोजक आणि चाहते देखील पाठ फिरवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेमध्ये इशान किशनला भेटला भारतीय फॅन! म्हणाला, ‘मी पटनाचा…’
अनुभवी संघांना पछाडत नवख्या जर्सीने मारली बाजी! वर्ल्डकप क्वालिफायर्सचे तिकीट केले बुक
विंडीजच्या ‘या’ खेळाडूने संघासाठी एक नव्हे तर दोन विश्वचषक जिंकण्याची इच्छा केली व्यक्त