2007 टी20 विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य युसुफ पठाणला आयपीएल 2020 च्या लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा युसूफ आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो.
आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या लिलावाआधी हैदाबादने त्याला लिलावासाठी मुक्त केले होते. त्यानंतर गुरुवारी कोलकाता येथे झालेल्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने त्याच्यावर बोली लावली नाही.
त्यामुळे युसूफचा धाकटा भाऊ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला आहे.
इरफानने भावनिक ट्विट करताना लिहिले की, ‘छोट्या घटनेमुळे तुझी कारकिर्द समजावून सांगू शकत नाही. तूझ्या संपूर्ण कारकीर्दीत तू शानदार कामगिरी केली आहे. वास्तविक सामना जिंकवणारा खेळाडू आहे. तूझ्यावर आम्ही नेहमीच प्रेम असेल, लाला.’
Small hiccups doesn’t define your career,you have been outstanding thru out. A real match winner. Love you always Lala @iamyusufpathan pic.twitter.com/h3tw3AjoGS
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 19, 2019
युसुफची या लिलावासाठी 1 कोटी ही मुळ किंमत होती. पण त्याने दोन्ही फेरीमध्ये कोणीही पसंती दाखवलेली नाही.
37 वर्षीय युसुफची मागील दोन मोसमात चांगली कामगिरी झालेली नाही. त्याने गेल्या मोसमातील दहा सामन्यांत केवळ 40 धावा केल्या. तसेच एकही विकेट घेतली नाही. तसेच त्याने 2018 मध्ये 15 सामन्यात 28.88 च्या सरासरीने 260 धावा केल्या होत्या.
त्याने आयपीएल कारकिर्दीत 174 सामने खेळताना 142.97 च्या स्ट्राईक रेटने 2241 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 7.40 च्या इकाॅनामी रेटने 42 विकेट्स घेतले आहेत.
2020 च्या सनरायझर्स हैदराबाद संघाबद्दल बोलायचे झाले तर यावर्षीच्या लिलावात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श, वेस्ट इंडिजचा फॅबियन ऍलन, युवा भारतीय फलंदाज विराट सिंग, प्रियम गर्ग, जम्मू-काश्मीरचा अब्दुल समद, संजय यादव आणि बी. संदीपला विकत घेतले आहे.
असा आहे 2020 आयपीएलसाठी सनरायझर्स हैद्राबाद संघ –
केन विल्यमसन (कर्णधार) डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशिद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बासील थंपी , टी नटराजन, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबिएल ऍलन, बिली स्टॅनलेक, अब्दुल समद आणि संजय यादव.
६७ व्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे निकाल
वाचा👉https://t.co/IpKzF7U17V👈#म #मराठी #Kabaddi @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019