---Advertisement---

आयपीएल लिलाव : शाकिब अल हसनवर लागली कोट्यावधी रुपयांची बोली, ‘या’ संघात झाला सामील

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 3:45 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव चेन्नई येथे सुरू झाला आहे. जगभरातील तब्बल २९८ खेळाडू या लिलावात नशीब आजमावत आहेत. यशोदा पहिल्या गटातील स्टीव्ह स्मिथ हा फलंदाज कोट्यावधी रुपयात विकले गेल्यानंतर, अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावली गेली. ज्यामध्ये, बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याने मोठी रक्कम मिळवली.

शाकिबला मिळाली मोठी रक्कम

बांगलादेशचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असलेला २०१८ नंतर प्रथमच आयपीएल मध्ये सहभागी होत होता. शकिबवर पंजाब किंग्सने बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्याचा पहिला आयपीएल संघ कोलकता नाईट रायडर्सने लिलावात उडी घेतली. काहीवेळ रस्सीखेच झाल्यानंतर ३.२० कोटी रुपयांना तो केकेआर संघाचा भाग झाला.

केकेआरचा भाग राहिला आहे शाकिब

शाकिब अल हसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात कोलकत्ता संघासोबतच केली होती. २०१२ व २०१४ या हंगामाची विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाचा तो भाग होता. २०१८ साली चला सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, आयसीसीने निलंबन केल्याने तो २०२० आयपीएल मध्ये सहभागी होऊ शकला नव्हता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---