Most Expensive Players of IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामासाठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर आयोजित केला गेला. दुबईत पार पडलेल्या या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब एका रात्रीत बदललाना दिसले. ऑस्ट्रेलियाला नुकताच वनडे विश्वचषक जिंकवून देणाऱ्या मिचेल स्टार्क याच्यासोबत असेच काहीसे झाले. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर सर्वात मोठी बोली लावून दिग्गजाला संघात सामील केले. आपण या लेखात आतापर्यंत प्रत्येक आयपीएल हंगामात सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
आयपीएल 2008 ते 2023 पर्यंत प्रत्येक हंगामातील महागडे खेळाडू
उद्घाटनाच्या म्हणजेच आयपीएल 2008 (IPL 2008) हंगामातील सर्वात महागडा खेळाडू चेन्नई सुपर किंग्स संघाचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ठरला होता. धोनीला या हंगामाच्या लिलावात सीएसकेने 9.5 कोटींची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले होते. त्यानंतर आयपीएल 2009 हंगामात सर्वात महागडा ठरलेले खेळाडू म्हणजे अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि केविन पीटरसन होय. त्यांना प्रत्येकी 9.8 कोटी रुपये मिळाले होते. पीटरसनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 9.8 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते, तर फ्लिंटॉफला सीएसकेने संघाचा भाग बनवले होते. आयपीएल 2010 हंगामातील महागडा खेळाडू कायरन पोलार्ड होता. त्याला मुंबई इंडियन्सने 4.8 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतले होते.
याव्यतिरिक्त आयपीएल 2011मधील सर्वात महागडा खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) होता. गंभीरला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 14.9 कोटी रुपयांची बोली लावत संघाचा भाग बनवले होते. आयपीएल 2012 हंगामात पुन्हा एकदा महागडा खेळाडू ठरण्याचे भाग्य सीएसकेच्या खेळाडूला लाभले होते. सीएसकेने रवींद्र जडेजा याला 12.8 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील केले होते.
आयपीएल 2013 हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ठरला होता. त्याला मुंबईने 6.3 कोटी रुपयांत संघाचा भाग बनवले होते. आयपीएल 2014मध्ये महागडा खेळाडू बनण्याचा मान युवराज सिंग (Yuvraj Singh) याने मिळवला होता. त्याला आरसीबीने 14 कोटींची बोली लावत संघात घेतले होते. विशेष म्हणजे, युवराज आयपीएल 2015मध्येही सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला दिल्ली कॅपिटल्सने विक्रमी 16 कोटी रुपयांची बोली लावली होती. अशाप्रकारे तो हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
आयपीएल 2016च्या हंगामात महागडा खेळाडू बनण्याचा मान शेन वॉटसन याला मिळाला होता. त्याला आरसीबीने 9.5 कोटी रुपयात संघात घेतले होते. त्यानंतर आयपीएल 2017 हंगामात बेन स्टोक्सने महागडा खेळाडू बनण्याचा मान मिळवला होता. त्याला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने 14.5 कोटी रुपयात खरेदी केले होते. स्टोक्सने आयपीएल 2018चा हंगामही गाजवला होता. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने 12.5 कोटी रुपयात संघात घेतले होते.
आयपीएल 2019 हंगामात मिस्ट्री स्पिनर म्हणून नावारुपाला आलेला वरुण चक्रवर्ती आणि जयदेव उनाडकट यांनी महागडा खेळाडू ठरण्याचा पराक्रम केला होता. वरुणला पंजाब किंग्स संघाने 8.4 कोटी रुपयात संघाचा भाग बनवले होते. तसेच, उनाडकटला राजस्थानने 8.4 कोटीत आपल्या संघात घेतले होते. आयपीएल 2020मध्ये पॅट कमिन्स हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला केकेआरने 15.5 कोटी रुपयात संघात घेतले होते. आयपीएल 2021 हंगामात ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू बनला होता. त्याला राजस्थानने 16.25 कोटी रुपयात खरेदी केले होते. यानंतर आयपीएल 2022 हंगामाचा महागडा खेळाडू ठरण्याचा मान इशान किशनला मिळाला होता. त्याला मुंबईने 15.25 कोटी रुपयात घेतले होते.
मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 हंगामात सॅम करन (Sam Curran) या पठ्ठ्याने सर्वच विक्रम मोडीत काढले होते. त्याला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपयात संघात घेतले होते. अशाप्रकारे सॅम करन आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. आता आयपीएल 2024 लिलावात मिचेल स्टार्क सर्वात महागाडा खेळाडू ठरला आहे. केकेआरने 24.75 कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले. (ipl auction 2024 these players were the most expensive in the ipl auctions ishan kishan to yuvraj singh see list)
आयपीएल हंगामाच्या प्रत्येक लिलावातील सर्वात महागडे खेळाडू (Most expensive player at each IPL auction)
2008: एमएस धोनी
2009: फ्लिंटॉफ/पीटरसन
2010: शेन बाँड/पोलार्ड
2011: गौतम गंभीर
2012: रवींद्र जडेजा
2013: ग्लेन मॅक्सवेल
2014: युवराज सिंग
2015: युवराज सिंग
2016: शेन वॉटसन
2017: बेन स्टोक्स
2018: बेन स्टोक्स
2019: जयदेव उनाडकट/ वरुण चक्रवर्ती
2020: पॅट कमिन्स
2021: ख्रिस मॉरिस
2022: इशान शन
2023: सॅम करन
2024: मिचेल स्टार्क*
हेही वाचा-
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास
IPL 2024 Auction: चेन्नईने दाखवला न्यूझीलंडच्या फलंदाजावर विश्वास, एकट्यावर केले तब्बल ‘एवढे’ कोटी खर्च