IPL 2024 Auction: आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव दुबईत पार पडत आहे. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने रिलीज केलेल्या हर्षल पटेल या खेळाडूवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. पंजाब किंग्स संघाने त्याच्यावर 11 कोटींपेक्षा जास्तीची बोली लावून त्याला संघाचा भाग बनवले.
हर्षल पटेल 11.75 कोटीत पंजाबच्या ताफ्यात
वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावासाठी आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती. मात्र, त्याला बेस प्राईजच्या 5 पटींहून जास्त रक्कम मिळाली. पंजाब किंग्सने त्याच्यावर 11.75 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले.
मागील हंगामात मिळालेले 10.75 कोटी
हर्षल पटेल आयपीएल 2023 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. त्याला आरसीबीने 10.75 कोटी रुपयात रिटेन केले होते. मात्र, त्याला आता या रकमेपेक्षा 1 कोटी रुपये जास्त मिळाले. आता हर्षल पंजाबच्या वेगवान गोलंदाजी फळीचा भाग बनला आहे.
हर्षल पटेलचा दांडगा अनुभव
हर्षल पटेलला आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. तो 2012 सालापासून आयपीएलचा भाग आहे. त्याने 11 हंगाम खेळले आहेत. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये 91 सामने खेळले आहेत. त्याने या 91 सामन्यात गोलंदाजी करताना 24.07च्या सरासरीने आणि 8.59च्या इकॉनॉमी रेटने तब्बल 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एका डावात 2 वेळा चार विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, एका डावात 1 वेळा 5 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच, फलंदाजी करताना 236 धावाही केल्या आहेत. (Harshal Patel gets a whopping INR 11.75 Crore bid from Punbjab Kings in IPL 2024 auction)
हेही वाचा-
IPL 2024: हॅरी ब्रूकवर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस, तब्बल ‘एवढे’ कोटी देऊन घेतले संघात
IPL 2024 Auction: वर्ल्डकप गाजवणारा पठ्ठ्या CSKच्या ताफ्यात, रचिन ‘एवढ्या’ कोटी रुपयात बनला चेन्नईकर