---Advertisement---

IPL Auction: पहिल्या सत्रात श्रेयस अय्यर सर्वात महागडा; १० स्टार खेळाडूंना लागली किती रुपयांची बोली, पाहा यादी

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 1:28 PM
Shreyas Iyer, Shikhar Dhawan
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावात पहिले सत्र मार्की प्लेअर्सचे म्हणजेच लक्षवेधी चेहरे असणाऱ्या खेळाडूचे पार पडले.

या सत्रात १० स्टार खेळाडूंचा लिलाव झालेला पाहायला मिळाला. या पहिल्या सत्रात श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १२.१५ कोटींच्या बोलीसह आपल्या ताफ्यात दाखल केले. त्याच्याव्यतिरिक्त पहिल्या सत्रात कोणताही खेळाडू १० कोटींहून अधिक रुपयांची बोली मिळवू शकला नाही.

अय्यरच्या पाठोपाठ कागिसो रबाडाला सर्वाधिक किंमतीची बोली लागली. रबाडासाठी पंजाब किंग्सने ९ कोटी २५ लाख रुपये मोजले आहेत. त्याच्याशिवाय पंजाबने शिखर धवनला देखील विकत घेतले असून त्याच्यासाठी त्यांनी ८.२५ कोटी रुपये मोजले आहेत.

तसेच या यादीत सर्वांचेच लक्ष होते, ते डेविड वॉर्नरकडे. त्याला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दरम्यान, पहिल्या सत्रात  लिलाव झालेल्या १० खेळाडूंच्या मुळ किमती २ कोटी होत्या. यातील प्रत्येकाला ५ कोटींहून अधिकची बोली लागली आहे.

आयपीएल लिलाव – २०२२

दहा प्रमुख मार्की प्लेयर्स यांचे नवे संघ आणि लिलावात मिळालेली रक्कम

१ : शिखर धवन
नवा संघ – पंजाब किंग्ज
मिळालेली रक्कम – ८ कोटी २५ लाख

२ : रविचंद्रन आश्विन
नवा संघ – राजस्थान रॉयल्स
मिळालेली रक्कम – ५ कोटी

३ : पॅट कमिन्स
नवा संघ – कोलकाता नाईट रायडर्स
मिळालेली रक्कम – ७ कोटी २५ लाख

४ : कसिगो रबाडा
नवा संघ – पंजाब किंग्ज
मिळालेली रक्कम – ९ कोटी २५ लाख

५ : ट्रेंट बोल्ट
नवा संघ – राजस्थान रॉयल्स
मिळालेली रक्कम – ८ कोटी

६ : श्रेयस अय्यर
नवा संघ – कोलकाता नाईट रायडर्स
मिळालेली रक्कम – १२ कोटी २५ लाख

६ : मोहम्मद शमी
नवा संघ – गुजरात टायटन्स
मिळालेली रक्कम – ६ कोटी २५ लाख

८ : फाफ डू प्लेसिस
नवा संघ – रॉयल चॅलेंजर बेँगलोर
मिळालेली रक्कम – ७ कोटी

९ : क्विंटन डी कॉक
नवा संघ – लखनऊ सुपर जायंट्स
मिळालेली रक्कम – ६ कोटी ७५ लाख

१० : डेव्हिड वॉर्नर
नवा संघ – दिल्ली कॅपिटल्स
मिळालेली रक्कम – ६ कोटी २५ लाख

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL Auction: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! दिल्ली कॅपिटल्सने ‘एवढ्या’ कोटींसह घेतले विकत

IPL Auction: मोहम्मद शमी गुजराज टायटन्सच्या ताफ्यात दाखल, ६ कोटी २५ लाखांची लागली बोली

IPL Auction: दक्षिण आफ्रिकेचा ‘स्पीडगन’ रबाडाचा पंजाब संघात समावेश, तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---