इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे १५ वे हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा (ipl mega auctions ) पार पडला. या मेगा ऑक्शनमध्ये पूर्वीच्या ८ संघांसह लखनऊ सुपरजायंट्स आणि अहमदाबाद टायटन्स या दोन संघांनी देखील सहभाग घेतला होता. दरम्यान मेगा ऑक्शनमध्ये युवा खेळाडू कोट्यवधी झाले. तर भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंवर देखील पैशांचा पाऊस पडला आहे.
गतवर्षी आयपीएल स्पर्धेत मोहम्मद शमीने (Mohammad shami ) पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु आगामी आयपीएल हंगामासाठी त्याला रिलीज करण्यात आले होते. या मेगा ऑक्शनमध्ये त्याला गुजरात टायटन्स संघाने आपल्या ताफ्यात स्थान दिले आहे. त्याच्यावर ६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या संघासाठी तो आगामी हंगामात मोलाची भूमिका बजवताना दिसून येऊ शकतो.
आयपीएल २०२१ स्पर्धेत केली होती अप्रतिम कामगिरी
मोहम्मद शमीने गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांना अडचणीत टाकले होते. तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत होता. त्याने खेळलेल्या १४ सामन्यात एकूण १९ गडी बाद केले होते. तसेच त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने या स्पर्धेत एकूण ७७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८.६३ च्या इकोनॉमिने गोलंदाजी करत ७९ गडी बाद केले आहेत. यादरम्यान १५ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
मेगा लिलावाच्या पूर्वसंध्येला दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून आली महत्त्वाची माहिती
भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे
टीम इंडियाचा मालिका विजय; कर्णधार रोहितचा भीम पराक्रम, किंग कोहलीलाही टाकलंय मागे






