---Advertisement---

IPL Auction: पॅट कमिन्स पुन्हा एकदा केकेआर संघात, ७ कोटींहून अधिक रुपयांची लागली बोली

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 12:26 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात  (ipl mega auctions )अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावात पॅट कमिन्स (pat cummins) हा देखील स्टार खेळाडूंपैकी एक होता.

आयपीएल २०२२ लिलावासाठी २ कोटी रुपयांची मुळ किंमत असलेल्या पॅट कमिन्ससाठी लखनऊ आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांनी बोली लावत त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर केकेआर संघाने बोली जिंकत त्याला आपल्या गोटात सामील केले. त्याच्यावर कोलकाताने ७.२५ कोटी रुपयांची बोली लावली.

कमिन्स २०२० च्या लिलावात १५.५० कोटी रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी त्याला कोलकाता नाईट राडर्सने संघात घेतले होते. त्यामुळे कमिन्स २०२० आणि २०२१ हंगाम कोलकाताकडून खेळला होता. आता पुन्हा एकदा तो याच संघाकडून खेळताना दिसणार आहे.

कमिन्सने ३७ आयपीएल सामने खेळले असून ३८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने फलंदाजी करताना २ अर्धशतकेही केली आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

टीम इंडियाचा मालिका विजय; कर्णधार रोहितचा भीम पराक्रम, किंग कोहलीलाही टाकलंय मागे

IPL Auction: ट्रेंट बोल्टला लागली तब्बल ८ कोटींची बोली, ‘या’ संघात झाला सामील

IPL auctions:दिल्लीकर ‘शिखर’चा पंजाबच्या ताफ्यात प्रवेश, तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---