---Advertisement---

IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली

Mumbai-Indians
---Advertisement---

बंगळुरु येथे इंडियन प्रीमीयर लीगचा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. हा लिलाव आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी झाला. या लिलावात अनेक आश्चर्यकारक निर्णय फ्रँचायझींकडून घेण्यात आले. अनेक दिग्गज खेळाडू या लिलावात अनसोल्ड राहिले, तर अनेक युवा खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. या लिलावात इंग्लंडचा गोलंदाज टायमल मिल्सही करोडपती झाल्याचे पाहायला मिळाले.

टायमल मिल्ससाठी मुंबई इंडियन्सने १ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात घेतले. मिल्सला संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद देखील प्रयत्न करत होते. मात्र, मुंबईने त्याची बोली जिंकली. मिल्सचा हा एक प्रतिभाशाली गोलंदाज असून यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळला आहे. 

मिल्सला १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा अनुभव आहे. तसेच त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १५६ टी२० सामने देखील खेळले आहेत. यात त्याने १७६ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीजच्या ‘या’ गोलंदाजासाठी चेन्नई- मुंबईही भिडले, पण हैदराबादने ७.७५ कोटी मोजत मारली बाजी

आयपीएलच्या बाजारात ‘विश्वविजेत्या’ कर्णधारांना नाही मिळाली किंमत

IPL Auction: मुंबईत बोल्टची जागा घेण्यास आर्चर सज्ज; ५ वेळच्या चॅम्पियन संघाने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---