आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राजीव शुक्लांचा पीए मोहम्मद अक्रम सैफीवर उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू राहुल शर्माने गंभीर आरोप केला आहे.
मोहम्मद अक्रम सैफीने राहुल शर्माचे उत्तर प्रदेश संघातील स्थान पक्के करण्यासाठी, राहुल शर्माकडे वैश्या पुरवण्याची मागणी केली होती असा अारोप केला आहे.
त्याचबरोबर मोहम्मद अक्रम सैफी बीसीसीआयच्या विविध वयोगटातील क्रिकेटपटूंना बनावट वयाचे दाखले पुरवत असल्याचाही आरोप केला आहे.
राहुल शर्माच्या या आरोपानंतर उत्तर प्रदेशच्या आणखी काही क्रिकेटपटू पुढे आले आहेत. या क्रिकेटपटूंनी उत्तर प्रदेश क्रिकेट संघात निवड होण्यासाठी निवड समितीचे सदस्य लाच मागत असल्याचाही आरोप केला आहे.
राहुल शर्माच्या आरोपानंतर बीबीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनीवर गौतम गंभीरची कठोर शब्दात टिका
–‘त्या’ सेलिब्रेशनचा जो रुटला झाला पश्चाताप!
–कसोटी संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचे भावुक ट्विट