भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे वेळेवर आयोजित करता आली नाही. परंतु असे असले तरीही आयपीएलचा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ कर्णधार म्हणून २ खेळाडूंना निवडण्यात आले आहे.
हे खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचे फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे आहेत. स्टार स्पोर्ट्सच्या तज्ज्ञ ज्युरीने ‘क्रिकेट कनेक्ट’ शोमध्ये ही यादी जाहीर केली आहे.
या यादीत सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार चेन्नई सुपर किंग्सचे स्टीफन फ्लेमिंग यांनी पटकाविला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएलचा सर्वोत्तम भारतीय फलंदाज म्हणून निवडले आहे. ज्याने आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १७७ सामन्यांमध्ये ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
याबरोबरच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या शेन वॉट्सनने सर्वकालीन सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूचा मान पटकाविला आहे. तो आता गोलंदाजी करत नसला तरीही, तो जेव्हा गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याची कामगिरी पाहून त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
क्रिकेटमध्ये ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) आरसीबीच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. या सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli), सुरेश रैना (Suresh Raina) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) या खेळाडूंचाही समावेश होता. परंतु शेवटी सर्वांना मागे टाकत सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजाच्या पुरस्कारासाठी डिविलियर्सची ज्यूरीने निवड केली.
गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्वकालीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकीपटू सुनील नारायणने या यादीत दुसरा क्रमांक पटकाविला.
या यादीत सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तरीही भुवनेश्वरला आयपीएलचा सर्वोत्तम भारतीय गोलंदाज म्हणून निवडले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताचे ३ महान अष्टपैलू, ज्यांनी विकेट व धावा घेऊन दिलेत सामने जिंकून
-५०९९ क्रिकेटपटूंमध्ये अशी कामगिरी करणारा जॅक कॅलिस जगातील एकमेव खेळाडू
-वनडे पदार्पणाच्या सामन्यातच ५ मेडन ओव्हर टाकणारे ५ गोलंदाज