---Advertisement---

तरुणांसाठी धोनीने निवृत्ती घ्यावी, माजी क्रिकेटपटूचे भावनिक वक्तव्य

On: सोमवार, एप्रिल 7, 2025 10:05 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चमक दाखवण्यात अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्जला या सामन्यात 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, आणि या पराभवानंतर 43 वर्षीय माहीच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता धोनीने आयपीएलमधूनही निवृत्त व्हावे.

शनिवारीच्या सामन्यात धोनीने 26 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. ही चेन्नईची आयपीएल 2025 मधील चौथ्या सामन्यातली तिसरी हार ठरली. या सामन्याच्या वेळी धोनीचे पालक प्रथमच स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने मत व्यक्त करताना सांगितले, “हो, जर धोनी आता नेतृत्व करत नसेल, तर अशा प्रकारची फलंदाजी पाहून थोडं वाईट वाटतं. आता त्याने युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी.”

सामन्यादरम्यान, जेव्हा धोनी फलंदाजीला आला, तेव्हा चेन्नईचा अर्धा संघ अवघ्या 74 धावांवर बाद झाला होता आणि त्यावेळी 56 चेंडूत 110 धावांची आवश्यकता होती. विजय शंकरसोबत धोनीने शेवटपर्यंत फलंदाजी केली, मात्र विजय हाताच्या अंतरावरच राहिला.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले, “धोनी निवृत्त होतोय की नाही, हे माझ्या हातात नाही. मला त्याच्यासोबत काम करताना आनंद मिळतो. तो अजूनही संघासाठी उपयुक्त आहे. मी सध्या त्याला या विषयावर विचारतही नाही. हे प्रश्न तुम्हीच विचारता.”

धोनीच्या भवितव्याबाबत अजूनही अनिश्चितता कायम असली तरी, चाहते आणि तज्ज्ञ त्याच्या प्रत्येक खेळीवर बारीक नजर ठेवून आहेत. आयपीएल 2025 ही त्याची शेवटची हंगाम ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---