---Advertisement---

आयपीएल मीडिया राईट्स: प्रत्येक चेंडू अन् प्रत्येक षटकामागे मिळणारी रक्कम पाहुन व्हाल थक्क

On: गुरूवार, जून 16, 2022 12:25 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) याचे वारे मागच्या १५ वर्षांपासुन विश्वभरात चांगलेच वाहत आले आहेत. आयपीएल स्पर्धा आता भारतापुरतीच मर्यादित राहिली नसुन तो विश्वभरातील क्रिकेटप्रेमींसाठी जणू एक सणच झाला आहे. म्हणुनच आयपीएल ही जगभरातील सगळ्यात कठीण आणि लोकप्रिय स्पर्धांमध्ये गणली जात आहे. त्याचमुळे या स्पर्धेचे प्रसारण हक्कांसाठी मोठमोठ्या उद्याेगपतींनी ई-लिलावामध्ये भाग घेतला आणि जमेल तितके पैसे खर्च केले आहेत.

आयपीएल (IPL) २०२३-२०२७च्या हंगामांच्या प्रसारण हक्कांसाठी १२ आणि १३ जुन रोजी मोठमोठ्या उद्योगपतींनी ई-लिलावामध्ये भाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या ई-लिलावाच्या अखेरीस आयपीएल २०२३-२०२७ चे प्रसारण हक्क भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ४८,३९० कोटी रुपयांना विकले आहे. जेणेकरुन बीसीसीआयला आता प्रत्येक चेंडूसाठी ४९ लाख रुपये मिळतील म्हणजेच प्रत्येक षटकामागे २.९६ कोटी रुपये मिळतील. याचाच अर्थ बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी ११८ कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर या भक्कम कमाईच्या शर्यतीत आयपीएल ही जगातील दुसरी महागडी स्पर्धा ठरली आहे.

आयपीएल २०२३-२०२७ चे भारतातील टीव्ही प्रसारण (पॅकेज ए) हक्क डिज्नी-स्टार (Disney Star) २३, ५७५ कोटी रूपयांनी याने मिळवले, तर डिजिटल प्रसारण (पॅकेज बी) हक्क वायकॉम १८ ने २३,७५८ कोटी रूपयांना मिळवले आहेत. पॅकेज सी सुद्धा वायकॉम १८ ने आपल्या नावे केली आहे. त्यासाठी त्यांनी २९९१ कोटी रुपये मोजले आहेत.

वायकॉमने टाइम्स इंटरनेट सोबत मिळुन पॅकेज डी सुद्धा आपल्या नावे केला आहे. त्यामध्ये वायकॉमला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंग्डम (यूके) क्षेत्रांमध्ये हक्क मिळाले आहेत. टाइम्स इंटरनेटला मध्यपूर्व देश, उत्तर आफ्रिका बरोबर अमेरिका आणि बाकीच्या उपखंडातील प्रसारण हक्क मिळाले आहेत.

२०१८ ते २०२२ या काळासाठी आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार इंडियाकडे होते. त्यावेळी त्याचे मूल्यमापन सुमारे २.५ अब्ज डॉलर्स होते. म्हणजेच १६३४७.५० कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. २००८ साली सोनी इंडियाने ८,२०० कोटी देऊन १० वर्षांचे प्रसारण हक्क मिळवले होते.

याआधी डिजिटल प्रसारणाचे हक्क २०१७मध्ये सर्वाधिक महाग विकले गेले होते. फेसबुकने हे हक्क ३९०० कोटी रूपयांना विकत घेतले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला बाहेर

भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तळपती फलंदाजी कामी, आयसीसी रँकिंगमध्ये ७५ वरून इशानची टॉप-१०मध्ये उडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---