---Advertisement---

IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात

---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स या संघात मंगळवारी (10 नोव्हेंबर) आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात ऑफस्पिनर जयंत यादवला संधी देण्याबाबत विचार केला आहे.

दिल्लीच्या संघात शिखर धवन, शेमरन हेटमायर, रिषभ पंत आणि अक्षर पटेल असे चार डावखुरे फलंदाज आहेत. आणि या सर्वांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. जयंत त्यांना रोखण्यात प्रभावी ठरू शकतो, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला आहे.

रोहितने सामन्याच्या आदल्या दिवशी सांगितले की, दिल्लीत जितक्या डावखुऱ्या फलंदाजांची संख्या आहे त्यानुसार जयंत प्रभावी सिद्ध होऊ शकतो. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याने एका सामन्यात गोलंदाजी देखील केली आहे. शिवाय तो दिल्ली संघाकडूनही याआधी खेळला आहे. त्यामुळे तो त्यांचा खेळ चांगल्या प्रकारे समजूही शकेल. त्यामुळे संघासाठी तो एक चांगला पर्याय आहे..

दिल्लीविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात जयंतला विकेट मिळाली नव्हती. आयपीएल 13 चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार असून पाचव्यांदा जेतेपद जिंकण्याचा मुंबई संघ प्रयत्न करेल. तर दिल्ली संघाला पहिल्याच प्रयत्नात हा किताब मिळवायचा आहे. आयपीएल इतिहासाच्या 13 वर्षात दिल्लीचा संघ प्रथमच अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

…..म्हणून हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये केली नाही गोलंदाजी, अंतिम सामन्याआधी कर्णधारानेच केला खुलासा

IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी

आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी ‘या’ सहा गोष्टी क्रिकेट चाहत्यांना जाणून घेणे आवश्यक

ट्रेंडिंग लेख –

राजधानी एक्सप्रेस ! ‘हा’ एकटा एकीकडे आणि दुसऱ्या संघाचे आख्खे गोलंदाज एकीकडे, वाचा दिल्लीच्या सरकार गोलंदाजाबद्दल

विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय

प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा दिल्लीचा हा पठ्ठ्या म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची जान आहे जान !!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---