राजस्थान राॅयल्सला (RR) चितपट करुन सनरायझर्स हैदराबादनं (SRH) आयपीएल 2024 च्या फायनल मध्ये प्रवेश केला. पॅट कमिन्सच्या हैदराबादसमोर (SRH) फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या सामन्याआधी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सचं एक मोठं वक्तव्य समोर आल आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “आमचा संघ आवडता आहे की नाही? हे मला माहित नाही. पण आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक आहोत यात शंका नाही. नुकताच एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंमध्येही नेमकी हीच भावना असल्याचं तो म्हणाला.” मात्र, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात आम्ही आमचं सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहोत. यापूर्वी पहिल्या क्वालिफायर मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. मात्र आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा फायनल सामन्यात समोर येणार आहेत.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादनं राजस्थानला 36 धावांनी धूळ चारत एकतर्फी सामना जिंकला. ट्रेविस हेड (34), राहुल त्रिपाठी (37), हेनरिक क्लासेन (50) या धावांच्या जोरावर हैदराबादनं राजस्थान समोर 175 धवांचा लक्ष्य ठेवलं. धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली. टॉम कोहलर-कॅडमोर स्वस्तात बाद झाला. मधल्या फळीत वारंवार विकेट्स गमावल्यानं राजस्थान 139 धावांवर आटोपला. गोलंदाजीत शाहबाज अहमदनं 4 षटकात 23 धावा देत 3 विकेट्स, तर अभिषेक शर्मानंही 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएल गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानावर तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या स्थानी राहिलं. आयपीएल 2024चा फायनल सामना (26 मे) रोजी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरती (KKR vs SRH) रंगणार आहे.
अशा असू शकतात. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
फायनलसाठी हैदराबादचा संघ– ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
फायनलसाठी कोलकाताचा संघ- रहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर(कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसल, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
महत्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजारानं इंग्लंडमध्ये ठोकलं आणखी एक शतक, आता तरी टीम इंडियात स्थान मिळणार का?
भारतीय संघाचा भविष्यातील प्रशिक्षक कोण होणार? गौतम गंभीरकडे असणार लक्ष!
प्लेऑफमध्ये आरसीबीचा पराभव करणं पडतं महागात! समोर आला अनोखा योगायोग