अहमदाबाद। गेले दोन महिने भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा थरार रंगला. या हंगामातील आता अंतिम सामना रविवारी (२९ मे) होणार आहे. हा अंतिम सामना गुणतालिकेत पहिले दोन क्रमांक मिळवलेल्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातच होत आहे. गुजरातने पहिला क्वालिफायर सामना जिंकून आणि राजस्थानने दुसरा क्वालिफायर सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
दरम्यान, गुजरातचा हा पहिलाच हंगाम आहे. त्यामुळे त्यांनी अंतिम सामन्यात बाजी मारली, तर आयपीएलला नवा विजेता मिळेल. तसेच राजस्थानने तब्बल १४ वर्षांनी अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यांनी २००८ साली अंतिम सामना खेळताना चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आता १४ वर्षांनी त्यांच्याकडे दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी चालून आली आहे.
आमने-सामने आकडेवारी
गुजरात आणि राजस्थान (Gujarat Titans vs Rajasthan Royals) आयपीएलमध्ये दोनवेळा आमने-सामने आले आहेत. या दोन्हीवेळेस गुजरातने बाजी मारली आहे. हे दोन्ही सामने यावर्षीच्या आयपीएल हंगामातच झाले आहेत.
कशी असू शकते खेळपट्टी?
रविवारी होणारा आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यासाठी कोणती खेळपट्टी वापरली जाणारा हे पाहावे लागणार आहे. कारण अहमदाबादच्या या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काळ्या आणि लाल अशा दोन्ही मातीच्या खेळपट्ट्या आहेत.
काळ्या मातीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळते. पण फलंदाजांनाही धावा करता येतात. तसेच लाल मातीची खेळपट्टी लवकर सुकत असल्याने यावर फिरकीपटूंना मोठ्या प्रमाणात मदत मिळते. तरी, या मैदानात मोठ्या धावा झालेल्या पाहायला मिळालेल्या नाहीत. तसेच ६० टक्के सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
असे असेल हवामान
या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता दिसून येत नाही. तसेच आकाश निरभ्र राहण्याचे अंदाज आहेत. सामना रात्री ८ वाजता सुरू होणार असल्याने तापमान ३०-३५ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. पण आद्रता कमी राहिल (Weather Report).
आयपीएल २०२२ हंगामातील गुजरात विरुद्ध राजस्थान(GT vs RR) अंतिम सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना २९ मे २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु होईल.
४. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध राजस्थान अंतिम सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
अंतिम ११ जणांचे यातून निवडले जातील
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युझवेंद्र चहल, करुण नायर, जेम्स नीशम, रस्सी वॅन डर ड्युसेन, कॉर्बिन बॉश, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल
गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, प्रदीप संगवान, वरुण आरॉन, जयंत यादव, विजय शंकर, गुरकीरत सिंग मान, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, दर्शन नालकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, नूर अहमद.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत लॉराचा जलवा! बनली आख्खा एक हंगाम गाजवणारी पहिलीच खेळाडू
वय सोडा, कामगिरी पाहा! आयपीएलमध्ये ‘असा’ कारनामा फक्त धोनी अन् कार्तिकलाच जमलाय, टाका एक नजर
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत हरमनप्रीतच्या संघाचाच दबदबा, वेलोसिटीला हरवत तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी