भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी उपाध्यक्ष आणि इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) संस्थापक ललित मोदी (Lalit Modi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) मालक एन श्रीनिवासन (N. Srinivasan) यांच्यावर फिक्सिंगचे गंभीर आरोप केले आहेत. श्रीनिवासन हे बीसीसीआयचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. आता एका पॉडकास्टवर चर्चा करताना ललित मोदींनी सीएसकेच्या मालकावर पंच फिक्सिंगचा आरोप केला आहे.
व्हायरल झालेल्या या पॉडकास्टवर ललित मोदींनी (Lalit Modi) सांगितले की, एन श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांमध्ये पंचांची अदलाबदल करत असत. ललित मोदी म्हणाले, “त्यांनी पंच बदलण्याचे कामही केले, तो सीएसके सामन्यांमध्ये सीएसके पंचांना काम द्यायचा. मला हे आवडले नाही कारण तो उघडपणे फिक्सिंग करत होता. जेव्हा मी त्याच्याविरूद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो माझ्या विरोधात गेला.”
अँड्र्यू फ्लिंटॉफच्या वादावर ललित मोदींनी पुन्हा मोठे वक्तव्य केले आहे. खरे तर, सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर आयपीएल 2009च्या लिलावात अँड्र्यू फ्लिंटॉफला विकत घेण्यासाठी लिलाव फिक्स केल्याचा आरोप आहे. ललित यांनी पुन्हा हा विषय काढला आणि सांगितले की श्रीनिवासन यांना फ्लिंटॉफला विकत घ्यायचे होते आणि प्रत्येक फ्रँचायझीला त्यांनी केलेल्या फिक्सिंगची माहिती होती.
ललित मोदी (Lalit Modi) यांनी त्यांच्या नवीन विधानात म्हटले आहे की, “होय, आम्ही लिलावात फिक्सिंग केली. प्रत्येक फ्रँचायझीला याची माहिती होती. आम्ही सर्वांना फ्लिंटॉफवर बोली लावू नका, असे सांगितले होते कारण श्रीनिवासन यांना त्यांच्या संघात सामील करायचे होते. कारण त्याला विश्वास होता की, आयपीएलचा प्रयोग यशस्वी होणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; विराटने कशामुळे झळकावले शानदार शतक? गावसकरांचे मोठे वक्तव्य
IPL 2025; सर्वात खतरनाक दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन?
IND vs AUS; ऑस्ट्रेलिया संघात पडली फूट? स्टार खेळाडूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ