जगभरातील प्रतिष्ठित आणि सर्वात मोठी टी20 लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगला ओळखले जाते. याच आयपीएल 2023 स्पर्धेचा मिनी लिलाव एक महिन्यानंतर म्हणजेच 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावापूर्वीच सर्वाधिक 5 आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं तर, इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरला आहे. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. अशात जोफ्रा आर्चरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जोप्रा आर्चरने सुरू केला सराव
दीर्घकाळापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आता जवळपास पूर्णपणे फिट झाला आहे. तसेच, तो आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना दिसेल. त्याने गोलंदाजीचा सरावही सुरू केला आहे. जोफ्रा आर्चरचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो त्याच्या जुन्या अंदाजात परतल्याचे दिसत आहे.
Jofra Archer bowling in England whites, to Zak Crawley pic.twitter.com/Z8Z8appECw
— Will Macpherson (@willis_macp) November 23, 2022
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, “तो सध्या इंग्लंड लायन्स संघासोबत यूएईमध्ये उपचार घेत आहे. तो खूपच चांगल्याप्रकारे बरा होत आहे. तो ज्यापद्धतीने बरा होतोय, यावरून दिसते की, तो 2023च्या सुरुवातीला क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करू शकतो.” आयपीएल 2023ची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होईल. यासाठी अजून बराच वेळ आहे आणि ज्याप्रकारे आर्चर पुनरागमन करत आहे, तर ही मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आहे.
मेगा लिलावात मुंबईने आर्चरला केले होते रिटेन
मागील वर्षीपासून दुखापतींनी ग्रस्त असलेल्या आर्चरला मुंबई इंडियन्स मेगा लिलावात मोठी रक्कम मोजून संघात सामील केले होते. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सला हे माहिती होते की, तो आयपीएल 2022मध्ये खेळू शकणार नाही, तरीही त्यांनी त्याला संघात कायम केले. तसेच, आयपीएल 2023साठीही संघात रिटेन केले आहे. खरं तर, मुंबई संघाने म्हटले होते की, आर्चर दीर्घ काळासाठीची गुंतवणूक आहे. त्याच्या फिटनेसमधील सुधारणा पाहता मुंबईचा हा निर्णय योग्य ठरण्याच्या मार्गावर आहे. आर्चरने आयपीएल 2023मध्ये पुनरागमन केले, तर मुंबई इंडियन्स संघाला याचा मोठा फायदा मिळू शकतो. (IPL franchise mumbai indians jofra archer made a comeback on the cricket field)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान
‘तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याच्या विचारात होतो’, मालिका जिंकल्यानंतर अर्शदीपची खास प्रतिक्रिया