दक्षिण आफ्रिकेच्या आगामी नवीन टी२० लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षी जानेवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या नवीन टी२० लीगमधील सर्व सहा संघ विकत घेतले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांपैकी एकाने टीम लिलावादरम्यान फ्रेंचायझीसाठी यशस्वी बोली लावली.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, सीएसकेने चेन्नई सुपर किंग्स स्पोर्ट्स लिमिटेड या मूळ कंपनीमार्फत जोहान्सबर्ग फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने केप टाऊन फ्रँचायझी विकत घेतली, तर सनरायझर्सचे मालक सन टीव्ही ग्रुपने पोर्ट एलिझाबेथ फ्रँचायझी ताब्यात घेतली.
आरपी संजीव गोयंका ग्रुप, ज्याने गेल्या वर्षी लखनौ आयपीएल फ्रँचायझी विकत घेण्यासाठी ७०९० कोटी रुपयांची विक्रमी रक्कम दिली, डर्बन संघ निवडला, तर राजस्थान रॉयल्सने पार्ल संघ विकत घेतला. आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जिंदाल साउथ वेस्ट स्पोर्ट्सने प्रिटोरियाचा ताबा घेतला आहे.
लवकरच जाहीर केले जाईल
ही लीग क्रिकेट दक्षिण आफ्रिकेद्वारे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टच्या भागीदारीत चालवली जाईल. पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने नवीन मालकांची आणि ते प्रतिनिधित्व करतील त्या शहरांची औपचारिक घोषणा करणे अपेक्षित आहे.
उल्लेखनीय म्हणजे, विविध कारणांमुळे ग्लोबल लीग टी२० आणि मझांसी सुपर लीगमध्ये अपयशी ठरल्यानंतर ही नवीन स्पर्धा कायमस्वरूपी फ्रँचायझी-आधारित टी२० लीग सुरू करण्याचा सीएसएचा तिसरा प्रयत्न आहे.
दरम्यान, याआधीही अनेक आयपीेल फ्रँचायझी मालकांनी इतर टी२० लीगमधील संघ विकत घेतलल्याची माहिती आहे. यामध्ये नुकतीच कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान याने कॅरिबियन महिला क्रिकेट लीगमध्ये महिलांचा संघ विकत घेतला आहे. याची माहिती त्याने स्वत: त्याच्या सोशल मिडीयावरून प्रसारित केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बीसीसीआयचा कारभार सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चालवणार, वाचा काय आहे प्रकरण
युवा खेळाडूंमुळे बदललाय राहुल द्रविडचा स्वभाव, वेस्ट इंडीज दौऱ्यात दिसला नवीन अंदाजात
बाप रे बाप ! आख्ख्या संघाने मिळून कुटल्या ३३३ धावा, पण नाही मारला एकही षटकार