भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर हा मागील काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. मात्र, त्याच्या चर्चेत राहण्यामागील कारणं चांगली नव्हती. आयपीएल 2023 स्पर्धेतील एका सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली होती. यानंतर अनेकांनी आपापली मते मांडली. विराटचे चाहतेही म्हणाले की, गंभीरचे वागणे योग्य नव्हते. तसेच, गंभीरच्या चाहत्यांनी म्हटले की, गंभीरने मैदानात जे केले, ते योग्य होते. मात्र, गंभीरची एक अशी बाजू समोर आली आहे, ज्यामुळे आता विराटचे चाहतेही त्याचे कौतुक करतील.
माजी क्रिकेटपटूच्या मदतीसाठी धावला गंभीर
अशातच आता भारतीय संघाचा माजी खेळाडू राहुल शर्मा (Rahul Sharma) याने एक अशी गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून विराट कोहली (Virat Kohli) याचे चाहतेही गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचं कौतुक करतील. खरं तर, गंभीरने एक शानदार काम केले आहे. गौतम गंभीर राहुल शर्मा याच्या आजारी सासूच्या उपचारासाठी पुढे आला. राहुलच्या सासूला ब्रेन हॅमरेज (मेंदूमध्ये रक्तस्त्राव) होता, त्यामुळे त्यांची स्थिती खूपच गंभीर होती.
राहुल शर्माच्या सासूवरील उपचार यशस्वी
गंभीरने राहुलच्या सासूच्या उपचारासाठी आपला सहाय्यक गौरव अरोरा याच्याशी संपर्क साधला आणि त्यांचे उपचार एका सर्वोत्तम न्यूरोलॉजिस्टकडून करवून घेतले. राहुलच्या सासूला उपचारासाठी दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुलने ही सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर केली.
राहुलचा गंभीरला धन्यवाद
राहुलने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मागील महिना खूपच कठीण होता. माझ्या सासूला ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यांची स्थिती गंभीर होती. गौतम गंभीर पाजी आणि त्यांचे पीए गौरव अरोरा यांना धन्यवाद. त्यांनी कठीण काळात माझी मदत केली आणि त्यांनी सर्वोत्तम न्यूरोलॉजिस्ट आणि रुग्णालय मिळवून दिले.”
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, “इतक्या कमी वेळात सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली. त्या आता ठीक आहेत. गंगाराम रुग्णालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट देखभालीसाठी धन्यवाद. डॉ. मनीष चुग यांना विशेष धन्यवाद.”
आयपीएलच्या गुणतालिकेत लखनऊ तिसऱ्या स्थानी
आयपीएल 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स संघ 11 सामन्यात 11 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. लखनऊचा पुढील सामना 13 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. (ipl gautam gambhir arranges for medical facility for rahul sharma ailing mother in law in delhi read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी संघातून स्वत:च झाला बाहेर, आता भारतात वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा केली व्यक्त, कोण आहे तो?
Toss : 12 गुणांसाठी भिडायला मुंबई अन् बेंगलोर तयार; नाणेफेक जिंकत हिटमॅनचा गोलंदाजीचा निर्णय






