इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्लेऑफचे सामने मंगळवारी (२४ मे) सुरू होत आहेत. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावर्षीही कसाबसा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, पण यावर्षी देखील त्यांना विजेतेपद मिळण्याची खूप कमी शक्यता आहे. आयपीएलच्या इतिहासात फक्त एकदा असे झाले आहे की, एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans And Rajasthan Royals) यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर मंगळवारी खेळला गेला. क्वालिफायर-१ मधील सामन्यात जो संघ जिंकेल, तो थेट अंतिम सामन्यात स्थान पक्के करेल आणि जो संघ पराभूत होईल, त्याला मात्र अजून एक संधी मिळेल. गुजरात आणि राजस्थान संघ गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना मात्र दुसरी संधी मिळत नाही.
लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ यावर्षी गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बुधावारी (२५ मे) एलिमिनेटर सामन्यात त्यांचा आमना- सामना होईल. एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणार संघ स्पर्धेतून थेट बाहेर होईल, पण विजयी संघाला अंतिम सामन्यापर्यंत जाण्यासाठी अजून एक सामना खेळावा लागणार आहे. क्वालिफायर एकमध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकलेला संघ यांच्यात दुसरा क्लालिफायर सामना खेळला जाईल.
एका दृष्टीने पाहिले, तर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना नेहमीच अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक मेहनत करावी लागली आहे. सनरायझर्स हैदराबाद एलिमिनेटर सामना खेळलेला एकमेव संघ आहे, ज्यांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०१६मध्ये डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने ही कमाल केली होती. त्या हंगामात वॉर्नरच्या नेतृत्वातीत संघाने अंतिम सामन्यात विराटच्या आरसीबीला मात दिली होती. याच पार्श्वभूमीवर आता यावर्षी देखील आरसीबीला विजयाचा मार्ग सोपा दिसत नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल संघात असतो, तर…’ भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर हळहळला पुजारा
‘देशातील ऑलिम्पिक चळवळ अधिक भक्कम होण्याबाबत मी आशादायी’, नीता अंबानीचे मोठे वक्तव्य