पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी20 लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीग असे नामकरण करण्यात आलेल्या या लीगचा लॉन्चिंग सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. अतिशय दिमागदार झालेल्या या सोहळ्यात या स्पर्धेचा संचालक व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने एक मोठे वक्तव्य केले.
जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ही लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. या लीगद्वारे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये पैसा येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला काही उदयोन्मुख खेळाडू देखील या लीगमधून मिळू शकतात. अनेकजण या लीगची तुलना आयपीएलशी देखील करत आहे. याच मुद्द्यावर बोलताना स्मिथ म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, आम्ही आयपीएलचे प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. त्यांनी मागील पंधरा वर्षात जे काही मिळवले आहे ते केवळ विलक्षण वाटते. एक खेळाडू म्हणून त्या लीगचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. या एका स्पर्धेने अनेकांचे जीवन बदलले आहे. आयपीएलने ज्याप्रकारे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला, तशीच अपेक्षा आम्हाला आमच्या लीगकडून आहे.”
दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संघ आयपीएलमधील फ्रॅंचायजीने विकत घेतले आहेत. आयपीएलप्रमाणे खेळाडूंचा लिलाव होणारी ही केवळ दुसरी लीग आहे. लीगची सुरुवात 10 जानेवारी रोजी होऊन अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
(IPL Is Biggest T20 League We Are Not Comparing With Them Greame Smith Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिज चारीमुंड्या चीत! यजमानांचा पर्थ कसोटीवर 164 धावांनी कब्जा
सलामीपेक्षा मध्यक्रमात राहुल गोलंदाजांसाठी जास्त घातक! ‘अशी’ आहे आकडेवारी