---Advertisement---

नवरा क्रिकेटच्या मैदानात तर बायको तमिळ चित्रपट सृष्टीत करतेय धमाका

On: शुक्रवार, ऑगस्ट 28, 2020 1:33 PM
---Advertisement---

मुंबई । आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू मनीष पांडेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री आश्रिता शेट्टीशी लग्न केले. आश्रिता ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे.

2009 मध्ये पांडेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुध्द 73 चेंडूंत 114 धावा केल्या होत्या.  आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. सध्या तो सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो.

https://www.instagram.com/p/B5m-3qgnJFL/

16 जुलै 1999 रोजी मुंबईत आश्रिताचा जन्म झाला होता. तिने मार्केटींगमध्ये एमबीए केले आहे. तिने 2010 मध्ये एक सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिने आपल्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही.

2012 मध्ये तेलीकेदा बोल्ली या तेलगू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. यानंतर, ती तामिळ चित्रपट उदय एनएच 4, ओरू कन्नियुम मोनू कलावानीकलुम, इंद्रजित सारख्या अ‍ॅक्शन चित्रपटातही दिसली आहे.

https://www.instagram.com/p/CBXZhb3p0xv/

मनीष पांडे हा भारतीय संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे. मधल्या फळीत खेळणाऱ्या या फलंदाजाने भारतासाठी काही मोठ्या खेळी केल्या आहेत. मात्र प्रतिभा असूनही त्याला अपेक्षेपेक्षा जास्त संधी सुरुवातीला मिळू शकली नाही. परंतु आता तो नियमितपणे भारतीय संघात दिसतो. फलंदाजीसोबत तो उत्तम क्षेत्ररक्षण ही करतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---