आयपीएलमध्ये भ्रष्टाचाराबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंग यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, यावेळी आयपीएलचे आयोजन यूएईमधील ३ ठिकाणी म्हणजेच दुबई, शारजाह आणि आबू धाबी येथे होईल. त्यामुळे भारताच्या तुलनेत मॅच फिक्सिंगसारख्या भ्रष्टाचारावर नजर ठेवणे सोपे असेल. कारण भारतात आयपीएलचे आयोजन ८ ठिकाणी होते.
कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेले आयपीएल १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. आयपीएलमध्ये यावेळी ५१ दिवसांत ६० सामन्यांचे आयोजन होईल. पटेल यांनी म्हटले होते, की संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पुढील आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत याची घोषणा केली जाईल.
बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचे ८ अधिकारी ठेवणार नजर
अजित सिंग (Ajit Singh) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचे (Anti Corruption Unit) ८ अधिकारी पॅरोलवर असणार आहेत. ते बारीक लक्ष ठेवतील. तरीही यूएईमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यवस्था चालू आहेत ते पहावे लागेल. आम्हाला कोरोनामध्ये राहण्याची व्यवस्था करताना जैव-सुरक्षित वातावरणाचीही काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत अँटी करप्शन टीम कशाप्रकारे यावर लक्ष ठेवेल हे सांगणे घाईचे ठरेल.”
गरज पडल्यास अधिकाऱ्यांची करण्यात येईल निवड
ते पुढे म्हणाले, जर गरज पडली, तर आम्ही लक्ष ठेवण्यासाठी अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करू. जर शक्य झाले, तर आयसीसीचीही मदत घेता येईल. कारण त्यांचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. त्याचबरोबर आयसीसीमध्ये अँटी करप्शन युनिटचे मोठे पॅनेलही आहे.
आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांचा खर्च आयपीएलला करावा लागेल
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, आयपीएल ही एक खाजगी लीग आहे. यामध्ये आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यापूर्वी आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. जर आयसीसी अधिकाऱ्यांच्या नेमणूकीबाबत सहमत असेल, तर आयपीएलला अधिकाऱ्यांचा खर्च करावा लागेल.
बीसीसीआय प्रत्येक संघाबरोबर इंटीग्रिटी अधिकाऱ्यांची करणार नेमणूक
आयपीएल फ्रंचायझी संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएलदरम्यान बीसीसीआयला अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता असेल. कारण आयपीएलच्या प्रत्येक संघाबरोबर एका इंटीग्रिटी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. नियमानुसार, इंटीग्रिटी अधिकाऱ्याचा खर्च फ्रंचायझी संघच करतात. तरीही आयपीएल जैव-सुरक्षित वातावरणात होईल की नाही याबाबत बोलणे कठीण आहे.
यूएईमध्ये बुकी आणि फिक्सर अधिक सक्रिय
यूएईमध्ये बुकी आणि फिक्सर अधिक सक्रिय असतात. परंतु अँटी करप्शन युनिटचे प्रमुख सिंग यांना विश्वास आहे, की त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण नसेल. सिंग म्हणाले, अँटी करप्शन युनिटचे सूत्र इतके सक्षम आहेत की ते बुकी आणि फिक्सरबद्दल माहिती करून घेतील. हे लोक कसे कार्य करतात ते सूत्रांना माहीत आहे. अशा परिस्थितीत अँटी करप्शन युनिटला कोणतीही अडचण येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माजी क्रिकेटरने केली टीम इंडियाची निवड; पाहा कोणा-कोणाला दिले स्थान
-युवराज सिंगचा गंभीर आरोप; माझ्याबरोबर केला गेला गैरव्यवहार, असं नक्कीच अपेक्षित नव्हतं
-आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबर! आता थेट मैदानात पाहता येणार सामने
ट्रेंडिंग लेख-
-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी
-धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी
-या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे गेल्याने होणार फायदा