---Advertisement---

एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ सात भारतीयांवर मेगा लिलावात बसू शकतो ‘अनसोल्ड’ शिक्का

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 9:49 AM
ajinkya-rr
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडणार आहे. या लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी आली आहे. यामध्ये ३७० भारतीय खेळाडूंसोबतच ५९० नावांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत अशी अनेक नावे आहेत ज्यांनी मागील काही काळात खास कामगिरी केलेली नाही. अशा परिस्थीतीत काही नावे अशी आहेत ज्यांची विक्री होण्याची शक्यता कमी आहे. या लेखात आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

१) सुरेश रैना
३५ वर्षीय सुरेश रैना (Suresh Raina) २००८ नंतर पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. सुरेश रैनाने २०२० मध्ये आंतरराष्ट्रील क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो खुप कमी वेळा मैदानात खेळताना दिसला आहे. सुरेश रैनाने २०५ आयपीएल सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत. मात्र, गेल्या हंगामात १२ सामन्यांमध्ये त्याने १७.७७ च्या सरासरीने फक्त १६० धावा केल्या आहेत. २०२० च्या हंगामात तो खेळला नाही. २०१९ मध्ये सुमारे १२२ च्या स्ट्राईक रेटने आणि २४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सने रैनालाही संघात रिटेन केलेले नाही. इतर संघ त्याला संघात घेऊ शकतात.

२) अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे सध्या काही खास कामगिरी करताना दिसत नाही. त्याला कसोटी संघातून काढण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने २ सामन्यांमध्ये केवळ ८ धावा केल्या होत्या तर २०२० च्या हंगामात ९ सामन्यांमध्ये ११३ धावा केल्या. तसेच त्याने २०१२ ते २०१९ या दरम्याच्या हंगामांमध्ये त्याने ३०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने राजस्थान संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. पण आता त्याला बाकी संघानी विकत घेण्याची शक्यता कमी आहे.

३) इशांत शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची कारकीर्द धोक्यात आली आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात तो फक्त ४ सामने खेळला असून, त्याने फक्त एक विकेट घेतली आहेत. त्याने आयपीएल २०१३ नंतर २०१९ च्या हंगामात सर्वाधिक म्हणजे १० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. भविष्याचा विचार करून संघ लिलावात त्याच्यावर बोली लावतील याची शक्यता कमी आहे. कदाचित इशांत शर्मा या लीगमध्ये खेळताना दिसणार नाही.

४)केदार जाधव
२०१९ च्या विश्वचषकापर्यंत केदार जाधव हा भारताचा प्रमुख खेळाडू होता. पण त्यानंतरची त्याची कामगिरी पूर्णपणे खराब राहिली आहे. त्यामुळे तो भारतीय संघातून बाहेर पडला होता. गेल्या ४ हंगामात त्याने २९ सामन्यांमध्ये ३०३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा कमी होता. त्याच्या अशा खराब कामगिरीमुळे या लिलावत त्याला संघ विकत घेणार नसल्याची शक्यता आहे.

५) पियुष चावला
आयपीएलमध्ये ३३ वर्षीय पियुष चावलाने काही विशेष कामगिरी केलेली नाही. गेल्या मोसमात त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. २०२० मध्ये ७ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. दोन्ही हंगामात मिळून त्याने ७ विकेट घेतल्या. या मेगा लिलावात फ्रँचायझी पुढील २ ते ३ वर्षांचा विचार करून खेळाडूंची खरेदी करणार आहेत त्यामुळे त्याला कोणी विकत घेईल असे दिसत नाही.

६) एस श्रीसंत
आयपीएल २०१३ मधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे जवळपास ८ वर्षे मैदानापासून दूर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतच्या नावावरही बोली लावली जाणार आहे. ३८ वर्षीय श्रीशांत केरळकडून विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला आहे. लीगमधील ४४ सामन्यांत त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याची मूळ किंमत ५० लाख आहे, तरीही त्याला लीगमध्ये खेळण्याची संधी मिळू शकत नाही.

७) धवल कुलकर्णी
मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी हा आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आयपीएलचा भाग आहे. मागील दोन मोसमात त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि या दोन्ही सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नाही. २०१७ ते २०१९ या काळातही त्याने २४ सामने खेळले. २०१६ पासून त्याला सामन्यात दोनपेक्षा जास्त बळी घेता आलेले नाहीत. त्यामुळे त्याला कोणताही संघ या उजव्या लिलावात विकत घेऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या-

लाजवाब शतकासह यश धूल बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा कर्णधार; मिळाले विश्वविजयाचे शुभसंकेत (mahasports.in)

टीम इंडियाचा नवा भिडू म्हणतोय,”धोनी माझा आयडल, त्याच्यासारखेच फिनिशर व्हायचेय” (mahasports.in)

मेगा ऑक्शनपूर्वी उघड झाली केकेआरची रणनिती! प्रशिक्षक म्हणतायेत,”कोरोनानंतर…” (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---