जगप्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाला (IPL 2022) मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघ १२ व १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा लिलावात आपली संघबांधणी करतील. या मेगा लिलावाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याच लिलावाच्या काही जुन्या आठवणी प्रसिद्ध आयपीएल ऑक्शनर रिचर्ड मेडली (Richard Madley) यांनी सांगितल्या.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून दहाव्या हंगामापर्यंत ऑक्शनर म्हणून काम पाहणारे मेडली जगप्रसिद्ध ऑक्शनर म्हणून ओळखले जातात. २०२२ मेगा लिलावापूर्वी त्यांनी भारताचा वरिष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. मेडली यांनी २०१४ आयपीएल वेळच्या भारतीय दिग्गज युवराज सिंगच्या लिलावाचा किस्सा सांगितला (Yuvraj Singh Auction 2014). ते म्हणाले,
“आयपीएल २०१४ चा लिलाव काहीसा वादग्रस्त ठरला. त्या वेळी युवराज सिंग याला लिलावात मोठी किंमत लागली होती. रॉयल चॅलेंजेस बेंगलोरने १० कोटी रुपयांमध्ये त्याला विकत घेतले. मात्र, मी हॅमर खाली करायच्या काही क्षण आधी कोलकाता नाईट रायडर्सने बोली लावली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखेरीस युवराजची पुन्हा बोली लावली गेली. यावेळी तो १४ कोटी रुपयांना पुन्हा बेंगलोर संघाकडेच गेला. मात्र, बेंगलोर संघाचे संघमालक विजय मल्ल्या हे त्यावेळी चांगलेच संतापले. त्यांनी पहिल्या लिलावानंतर म्हटले, हे चुकीचे आहे तो माझा खेळाडू आहे.” विजय मल्ल्या यांनी याबाबत त्यावेळी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे अधिकृत तक्रार केली होती.
जागवल्या इतरही आठवण
मेडली यांनी पहिल्या आयपीएल वेळी एमएस धोनीच्या लिलावाला आजवरचा सर्वोत्कृष्ट लिलाव म्हटले. तर, कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक व प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याला आपण पहिल्यांदा ओळखलेच नव्हते, अशी कबुली देखील त्यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला अकरावा धोबीपछाड! तब्बल १६ वर्षांपासून भारत अजिंक्य
टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला अकरावा धोबीपछाड! तब्बल १६ वर्षांपासून भारत अजिंक्य
VIDEO: दिलदार कोहली! हुड्डाने विकेटचे खातं उघडताच विराटने दिली जादूची झप्पी