IPLक्रिकेटटॉप बातम्या

मोहम्मद नबीच्या मुलाने लगावला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही एकदा पाहाच

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. हा सामना गुरुवारी (11 एप्रिल) खेळला जाणार आहे. आतापर्यंत आयपीएलमधील मुंबईची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. मुंबईला आपल्या सुरुवातीच्या तिनही सामन्यांत पराभव मिळाला होता. त्यानंतर त्यांनी आपला पहिला विजय दिल्लीविरुद्ध मिळवला.

दरम्यान, मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत मैदानावर खेळताना दिसतोय. मोहम्मद नबीच्या मुलानं महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळला, ज्याचा व्हिडिओ मुंबईनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये नबी आपल्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. नबी गोलंदाजी करतोय आणि त्याच्या गोलंदाजीवर त्याच्या मुलानं हेलिकॉप्टर शॉट लगावला आहे. हा व्हिडिओ मुंबईने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून तो लोकांना खूप आवडत आहे. व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.

 

नबी हा अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो सध्या मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. परंतु आयपीएलच्या चालू हंगामात त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो फक्त एकाच सामन्यात खेळला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 18 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानंं 13 विकेट्स घेतल्या असून त्याचा सर्वाधिक स्कोर 31 आहे. 11 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. मात्र तो 2022 आणि 2023 मध्ये एकही सामना खेळू शकला नव्हता.

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे 4 सामने झाले आहेत. त्यापैकी संघाला 1 सामन्यात विजय मिळाला असून 3 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. मुंबईचा पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं 6 विकेट्सनं पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादनं 31 धावांनी मात दिली. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं त्यांचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा चौथा सामना त्यांनी 29 धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

“आय अ‍ॅम हॉटी, आय अ‍ॅम नॉटी”, सोशल मीडियावर रवी शास्त्रींचा अनोखा अंदाज; हिरोसारखी पोज देऊन घातला धुमाकूळ

डेव्हिड मिलर संघात परतणार का? गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याची संभाव्य प्लेइंग 11 काय असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Related Articles