मंगळवारी(१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२० च्या विजेतेपदाचा चषक उंचावत इतिहास रचला. याबरोबरच आयपीएलच्या १३ व्या हंगामाची अखेर झाली. या सामन्यानंतर मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मिळाला.
आत्तापर्यंत प्रत्येक हंगामात हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार आयपीएस समीतीकडून स्पर्धेच्या शेवटी दिला जातो. हा पुरस्कार त्याच खेळाडूला दिला जातो, ज्याने या संपूर्ण हंगामात प्रभावशाली कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या कामगिरीमुळे तो संघासाठी मॅचविनर खेळाडू ठरला आहे. या लेखात आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर पुरस्कार मिळवणारे खेळाडू –
२००८ – शेन वॉटसन
२००९ – ऍडम गिलख्रिस्ट
२०१० – सचिन तेंडुलकर
२०११ – ख्रिस गेल
२०१२- सुनील नारायण
२०१३ – शेन वॉटसन
२०१४ – ग्लेन मॅक्सवेल
२०१५ – आंद्रे रसल
२०१६ – विराट कोहली
२०१७ – बेन स्टोक्स
२०१८ – सुनील नारायण
२०१९ – आंद्रे रसल
२०२० – जोफ्रा आर्चर