---Advertisement---

MIचं टेन्शन वाढलं! सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा होऊ शकतो बाहेर

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 5:55 PM
---Advertisement---

अबू धाबी। आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतग्रस्त आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. यानंतर तो शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळला नव्हता. परंतु असे असले तरी मुंबईने तो सामना १० विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. आता असे म्हटले जात आहे की, रविवारी (२५ ऑक्टोबर) राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित खेळताना दिसणार नाही.

संघ व्यवस्थापन आपला नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनासाठी बुधवारी (२८ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धचा सामना पाहत असल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ असा की, दुखापतीनंतर रोहितला १० दिवसांचा ब्रेक असेल.

आयपीएल २०२० मध्ये पुढील महत्त्वाच्या सामन्यांसोबतच बीसीसीयचे लक्ष ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही आहे. अशामध्ये रोहित १०० टक्के बरा होऊनच मैदानावर परतेल अशी सर्वांना आशा आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे रोहितच्या दुखापतीचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. कारण तो आता भारतीय संघासाठी सर्व क्रिकेट प्रकारातील एक अविभाज्य घटक आहे. यापूर्वीही रोहित दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याहून परतला होता.

पाचव्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिका खेळू शकला नव्हता. त्या दोन्हीही मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मुंबई इंडियन्सने २३ ऑक्टोबरला खेळलेल्या सामन्यानंतर सांगितले होते की, रोहित शर्माला डाव्या पायाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. परंतु तो त्यातून बरा होत आहे. फ्रँचायझीने सांगितले होते की, बीसीसीआयशी बोलल्यानंतर ते रोहितच्या उपस्थितीवर विचार करतील. परंतु आता राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही तो खेळणार नसल्यामुळे कायरन पोलार्ड पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा 

-आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर

-रोहित शर्माची एक बॅट किती दिवस टिकते तुम्हाला माहिती आहे का?

ट्रेंडिंग लेख-

-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी

-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

-IPL च्या १३ व्या हंगामात ‘हे’ ५ मॅच विनर खेळाडू ठरले सुपर फ्लॉप; पहिला क्रमांक आश्चर्यकारक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---