आयपीएल २०२० यूएईच्या मैदानावर खेळली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील काही खेळाडूंनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर काही स्टार खेळाडू अद्याप फॉर्मशी झगडत आहेत. या हंगामातील आयपीएलचा आतापर्यंत जवळपास अर्धा प्रवास संपला आहे. परंतु अजूनही असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपला सर्वोत्तम फॉर्म गाठलेला नाही.
या लेखात केवळ युवा खेळाडूंचीच नाही, तर अशा दिग्गज खेळाडूंची नावे देखील आहेत ज्यांना या १३ व्या हंगामात आतापर्यंत इतके मोठे विक्रम करता आलेले नाहीत. अशा ५ खेळाडूंबद्दल या लेखात आपण जाणून घेऊया.
हे ५ खेळाडू खराब फॉर्मशी झगडत आहेत
१. एमएस धोनी
आयपीएल २०२० मध्ये खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचे नाव देखील सामील आहे. धोनीच्या नावावर आतापर्यंत आयपीएलमधील बरेच विक्रम आहेत. त्याने आपल्या संघाला ३ वेळा विजेतेपदही मिळवून दिले आहे.
परंतु या हंगामात धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याचा संघ गुणतालिकेमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यात धोनीने २५.७१ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत. यावेळी त्याने फलंदाजीद्वारे केवळ १३ चौकार आणि ७ षटकार लगावले आहेत. फलंदाजीतील धोनीचा फ्लॉप शो स्पष्टपणे दिसून येतो आणि याचाच परिणाम संघावर दिसला.
२. आंद्रे रसेल
कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज खेळाडू आंद्रे रसेलला या हंगामात अद्याप विशेष काही करता आलेली नाही. तो आपल्या संघासाठी फलंदाजी सोबतच गोलंदाजीमध्येही विशेष कामगिरी करू शकला नाही.
या हंगामात त्याने ९ सामन्यांत ११.५० च्या सरासरीने केवळ ९२ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत त्याने ६ विकेट घेतल्या आहेत. तो स्फोटक खेळाडू आहे, पण यावेळी तो फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी ठरताना दिसत आहे. तथापि, कोणत्याही सामन्यात त्याचा फॉर्म परत येऊ शकतो आणि तो सामना जिंकून देऊ शकतो.
३. पॅट कमिन्स
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२० च्या लिलावासाठी १५ करोड ५० लाख रुपयांच्या किंमतीत पॅट कमिन्सचा संघात समावेश केला होता. परंतु कमिन्सची गोलंदाजी युएईच्या मैदानावर प्रभावी ठरली नाही आणि तो विरोधी फलंदाजांवर दबाव आणू शकला नाही.
आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. संघाला त्याच्याकडून अशा कामगिरीची अपेक्षा नाही.
४. ग्लेन मॅक्सवेल
आयपीएल २०२० च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला १० कोटी ७५ लाखांची किंमत देऊन त्यांच्या संघात समाविष्ट केले. अष्टपैलू मॅक्सवेल या मोसमात आतापर्यंत आपला फॉर्म परत मिळविण्यात अपयशी ठरला आहे.
या अष्टपैलूवर पंजाब संघ जास्त अवलंबून आहे. परंतु त्यांचा खराब फॉर्म संघासाठी हानिकारक ठरत आहे. मॅक्सवेलने १० सामन्यांत १५ च्या सरासरीने केवळ ९० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीत फक्त २ विकेट घेतल्या आहेत.
५. केदार जाधव
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू केदार जाधव देखील आपला चांगला फॉर्म शोधत असलेल्या खेळाडूंच्या यादीत आहे. हरभजन सिंगने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जाधवची फिरकी गोलंदाजी युएईच्या मैदानावर चेन्नईसाठी मॅच विनर कामगिरी करेल अशी आशा संघाला होती.
परंतु त्याची अष्टपैलू कामगिरीची जादू दिसली नाही. त्याने आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली कामगिरी केलेली नाही. जाधवने केकेआरविरुद्ध १२ चेंडूत अवघ्या ७ धावा केल्या आणि हेच चेन्नईच्या पराभवाचे प्रमुख कारण होते.
ट्रेंडिंग लेख-
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल खेळण्यास तयार नसलेल्या मुंबईच्या गोलंदाजानेच मोडलं चेन्नईच कंबरडं, पाहा काय केली कामगिरी
-मुंबईच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट; पहिल्यांदाच झाला १० विकेट्सने पराभव