येत्या एप्रिल महिन्यात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या हंगामातील अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी कोरोना असल्या कारणामुळे ही स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. परंतु यावर्षी आयपीएलचे सामने भारतातच होणार आहेत.
हे सामने मुंबई,चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळूरु या ६ शहरांमध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता या स्पर्धेच्या नियमांमध्ये १० महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया, कोणते आहेत ते १० नियम?
१) हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर केला जाईल सील : खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संघांनी एक पूर्ण हॉटेल बुक केले पाहिजे. परंतु जर हे शक्य होत नसेल तर, हॉटेलचा एक विंग संघासाठी आरक्षित असेल. ज्यामध्ये संघाव्यतिरिक्त कोणालाही जाण्याची परवानगी नसेल.
२) खेळाडू स्वतः करतील आपला खर्च : बीसीसीआयने हादेखील निर्णय घेतला आहे की, जे खेळाडू युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य पूर्वमधून येत आहेत, त्यांना विलग्नवासात राहावे लागणार आहे. यासाठी लागणारा हॉटेलचा खर्च खेळाडूंनी स्वतः करावा असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
३) कुटुंब आणि संघामालक यांना देखील राहावे लागेल बायो बबलमध्ये : बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये खेळाडूंसह, कुटुंब आणि संघमालकांना देखील बायो बबलमध्येच राहावे लागणार आहे. तसेच आपात्कालीन स्थिती असेल तरच त्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच बाहेर जाण्यापूर्वी त्यांना बीसीसीआयचे मुख्य चिकिस्त्या अधिकाऱ्यांची अनुमती द्यावी लागेल.
४) लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केली जाईल समिती : कोव्हिड १९ ची भीती पाहता, बीसीसीआयने ४ लोकांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे नाव ‘बबल इंटीग्रिटी मैनेजर्स’ असे असेल. कोणत्याही संघाने बायो बबलचे उल्लंघन करू नये. म्हणून ही समिती नेमण्यात येणार आहे. तसेच जर कोणी बायो बबल नियमांचे उल्लंघन करताना आढळून आलं तर ही समिती थेट अधिकाऱ्यांना माहिती देईल.
५) बबल मध्ये प्रवेश करण्यापूर्वी चाचणी करणे अनिवार्य : बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खेळाडूंना तीन आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आली तरच बायो बबलमध्ये प्रवेश करू दिला जाईल.
६) बबल ते बबल सुविधा : जे खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. त्या खेळाडूंना पुन्हा विलग्णवासात राहावे लागु नये म्हणून बीसीसीआयने बबल ते बबल हा नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये खेळाडूंना थेट आपला संघ गाठता येणार आहे. परंतु येणाऱ्या खेळाडूंना बसणे किंवा चार्टर्ड प्लेनने यावे लागणार आहे, जेणेकरून ते कोणाच्याही संपर्कात येऊ नये.
७) त्वरित बदलला जाईल चेंडू : कोव्हिड १९ ची भीती पाहता, षटकार मारल्यानंतर चेंडू जर स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर गेला तर त्याला त्वरित बदलले जाईल. तसेच तो चेंडू सैनेटाइज करून पुन्हा खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
८) चेन्नईमध्ये असेल विशेष पास : तामिळनाडू शासनाने एक नवीन नियम लागू केला आहे. त्यानुसार चेन्नईमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना एक विशेष ई पास घ्यावा लागणार आहे. जो पास तामिळनाडू शासनातर्फे दिला जाईल.
९) हॉटेलमध्ये असणार वेगळे चेक-इन काउंटर : हॉटेलमध्ये येणाऱ्या इतर लोकांसोबत संपर्क होऊ नये म्हणून, हॉटेलमध्ये वेगळे चेक-इन काउंटर असणार आहेत.
१०) बीसीसीआय अधिकारी आणि खेळाडूंमध्ये नसेल कुठलाच संपर्क : आयपीएलच्या नवीन नियमानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंना भेटण्याची अनुमती दिली जाणार नाही. तसेच कुठलाही अधिकारी बायो बबलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी नेहमी लॉजिकली ऑन द स्टम्प बॉलिंग करतो’; देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या भाषेत राजकीय फटकेबाजी
चाहत्यांचे प्रेम पाहून वनडे मालिकेतून बाहेर गेलेला श्रेयस अय्यर झाला भावनिक, म्हणाला…
टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा