---Advertisement---

टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा

On: गुरूवार, मार्च 25, 2021 3:03 PM
---Advertisement---

भारतीय संघ पुण्यात इंग्लंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडे सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मिळालेल्या रिकाम्या वेळेत भारतीय संघ मौजमजा करताना दिसून येत आहे. नुकताच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक फोटो ट्विट केला आहे, ज्यामध्ये संघातील सर्व खेळाडू दिसून येत आहेत. या फोटोला रिट्विट करत माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी ‘एक बाण दोन निशाणे’ साधत केएल राहुल आणि रिषभ पंत यांना ट्रोल केले आहे.

गुरुजींनी (शास्त्री) संघातील खेळाडूंसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यावर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “संघ.. जो नेहमी सोबत असतो. बायो बबल असो किंवा बायो बबलच्या बाहेर. निकाल येत जात राहतात. सुंदर पुण्यातील एक अविस्मरणीय दिवस.”

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1374643520556969988?s=20

या फोटोमध्ये सर्व खेळाडू छोट्याशा पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. दुसरीकडे केएल राहुल, हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य याला मांडीवर बसवून पोज देताना दिसत आहे. वसीम जाफरने हे ट्विट रिट्विट करत लिहिले आहे की, “पाहा केएल राहुल कसा बेबी अगस्त्यला आपल्या कुशीत धरून थांबला आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आधीपासूनच एक उत्तम बेबीसिटर राहिले आहेत.” असे म्हणत जाफरने रिषभ पंतवर देखील निशाणा साधला आहे.

https://twitter.com/WasimJaffer14/status/1374700190498574342?s=20

वसीम जाफरने यापूर्वी भारतीय युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला देखील ट्रोल केले होते. २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन आणि रिषभ पंत यांच्यात कसोटी मालिकेत मजेशीर बाचाबाची झाली होती, ज्यामध्ये पेनने रिषभला बेबीसिटर असे म्हटले होते. त्यांनतर पेनच्या पत्नीने देखील इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यावर तिने “बेस्ट बेबीसिटर रिषभ पंत” असे लिहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कसा आहेस भावा? रिषभच्या प्रश्नावर रोहितचा अश्लील इशारा; व्हिडिओ होतोय व्हायरल

अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

पुण्यात आहेत दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, जाणून घ्या कोणती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---