मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुलला कायम ठेवणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच अनेक अहवालांनी पुष्टी केली आहे की लखनऊ सुपर जायंट्स केएल राहुलला कायम ठेवणार नाही. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्स यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरनला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवू शकते. आता प्रश्न असा आहे की, लखनऊ सुपर जायंट्स त्यांच्या कर्णधाराला का सोडत आहे? असे मानले जाते की लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मार्गदर्शक झहीर खान केएल राहुलच्या स्ट्राइक रेटवर खूश नाहीत. याचे परिणाम केएल राहुलला भोगावे लागले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकोलस पुरन व्यतिरिक्त लखनऊ सुपर जायंट्स मयंक यादव, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना कायम ठेवतील. लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, केएल राहुलचा स्ट्राइक रेट गेल्या तीन हंगामांपासून एक समस्या आहे. त्यामुळे आता या यष्टिरक्षक फलंदाजावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 हंगामात, केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्ससाठी अनुक्रमे 136.13, 113.23 आणि 135.38 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. सूत्राने पुढे सांगितले की, ज्या वेळी इतर भारतीय फलंदाज टी20 फॉरमॅटशी जुळवून घेत आहेत. तेव्हा केएल राहुलचा स्ट्राइक रेट अधिक चांगला असू शकतो.
लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित पुढे सूत्राने सांगितले की, गेल्या हंगामात केएल राहुलने 520 धावा केल्या. परंतु संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. तर, गेल्या 3 हंगामात, निकोलस पूरनने अनुक्रमे 144.34, 172.95 आणि 178.21 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. याशिवाय लखनऊ सुपर जायंट्स निकोलस पुरन, मयंक यादव, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना कायम ठेवू शकतात.
हेही वाचा-
पुन्हा जिवघेणा बनला क्रिकेटचा खेळ, डोक्याला चेंडू लागून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
आफ्रिकेची आतषबाजी, बांग्लादेशचा धुव्वा, भारताचा हा विक्रम थोडक्यात वाचला
हेड कोच गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या! फसवणूक प्रकरणी नव्यानं तपास होणार